बरनॉल जपून ठेवा, सहा महिन्यांनी तुम्हालाच लागेल, भाजपचं आदित्य ठाकरेंना उत्तर

| Updated on: Dec 28, 2019 | 1:41 PM

रत्नागिरी : बरनॉल जपून ठेवा, सहा महिन्यांनी लागेल, अशा शब्दात भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या टीकेला उत्तर (BJP on Aditya Thackeray Burnol comment) दिलं आहे. भाजपचं दुःख समजू शकतो, पण बरनॉल द्या असं म्हणणार नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी टोला लगावला होता. पाठीत खंजीर खुपसण्याचं काम शिवसेनेने केलं. बरनॉल […]

बरनॉल जपून ठेवा, सहा महिन्यांनी तुम्हालाच लागेल, भाजपचं आदित्य ठाकरेंना उत्तर
Follow us on

रत्नागिरी : बरनॉल जपून ठेवा, सहा महिन्यांनी लागेल, अशा शब्दात भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या टीकेला उत्तर (BJP on Aditya Thackeray Burnol comment) दिलं आहे. भाजपचं दुःख समजू शकतो, पण बरनॉल द्या असं म्हणणार नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी टोला लगावला होता.

पाठीत खंजीर खुपसण्याचं काम शिवसेनेने केलं. बरनॉल जपून ठेवा, सहा महिन्यानंतर तुम्हालाच त्याची गरज लागेल. कारण जी विचारधारा त्यांच्यासोबत आहे, ती कधी आग लावेल हे कळणार नाही, असं प्रसाद लाड म्हणाले.

सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार हा मुद्दाच मागे राहिला. सर्वसामान्य शिवसैनिक हा सर्वसामान्यच राहिला. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील लोकंच आमदार आणि मुख्यमंत्री व्हायला लागलेत. त्यांना बोलण्याचा अधिकारच राहिला नाही, असा सल्ला आदित्य ठाकरेंना प्रसाद लाड यांनी दिला.

भाजपला विरोधी पक्षात बसण्याची सवय आहे. आमचा पक्ष संघर्षातून पुढे आलेला आहे. भाजपला सत्तेची हाव नाही. आम्ही विरोधीपक्ष म्हणून काम करणार, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

भाजपचं दुःख समजू शकतो, पण बरनॉल द्या म्हणणार नाही : आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिली नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी यांची लाचारी करणारी शिवसेना झाली आहे. उद्धवजी चांगले व्यक्ती आहेत, पण ते ज्यांच्या नादाला लागलेत, त्या नादाला लागून त्यांनाच गुरफटण्याचं काम सुरु झालंय. त्यांना फसवण्याचा डाव आहे, असा आरोपही प्रसाद लाड यांनी केला.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

जे बाहेर पडले सत्तेतून, ज्यांनी वचनं पाळली नाहीत. त्यांच्या मनात दुःख असेलच. ते दुःख समजून घेऊ शकतो मी. बरनॉल द्या असं मी सांगणार नाही. पण ठीक आहे, आम्ही आमच्या कामावर फोकस्ड आहोत. लोकांनी विश्वास ठेवला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

ट्रोलवर राग येणं स्वाभाविक आहे, पण मी सगळ्यांना सांगेन, की रागावर आता कंट्रोल करा. कारण जे वचनं न पाळता सत्तेबाहेर पडले, किंवा पाडले गेले, त्यांना दुःख होणार. जेलसी होणार. पण त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी त्यांच्या हातात फोन देऊ. जिथे त्यांनी इंटरनेट बंद केलं नसेल, तिथून ट्वीट करत राहतील, असा टोमणाही आदित्य ठाकरेंनी मारला.

बरनॉल क्रीम प्रकरण काय?

पहाटे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होऊ लागले होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांनी भाजप समर्थकांना मीम्समधून टोला लगावला होता. याच मीम्समध्ये बरनॉल क्रीमचा उल्लेख अनेकदा झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

सत्तास्थापनेनंतर आनंद व्यक्त करणाऱ्या भाजप समर्थकांचा फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर जळफळाट झाला असेल तर बरनॉल लावावं, असा सल्ला दिला जात होता. विशेष म्हणजे बरनॉल क्रीमसंदर्भातील गुगल सर्चमध्येही वाढ झाल्याचं दिसलं होतं.

BJP on Aditya Thackeray Burnol comment