सोनिया गांधी जनतेमुळे जिंकल्या तुमच्यामुळे नाही, प्रियांका गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना झापलं

| Updated on: Jun 13, 2019 | 2:21 PM

काँग्रेसच्या चिंतन मंथन बैठकीत 2022 च्या विधानसभा निवडणुकांवर चर्चा करण्यात आली. मात्र, यावेळी प्रियांका गांधी या कार्यकर्त्यांवर जरा नाराज दिसल्या.

सोनिया गांधी जनतेमुळे जिंकल्या तुमच्यामुळे नाही, प्रियांका गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना झापलं
Follow us on

रायबरेली : युपीए अध्यक्षा सोनिया गांधी बुधवारी (12 जून) रायबरेलीच्या एक दिवसीय दौऱ्यावर होत्या. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यादेखील त्यांच्यासोबत होत्या. दरम्यान त्यांनी भूएमऊ गेस्ट हाऊसमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या. काँग्रेसच्या चिंतन मंथन बैठकीत 2022 च्या विधानसभा निवडणुकांवरही चर्चा करण्यात आली. मात्र, यावेळी प्रियांका गांधी या कार्यकर्त्यांवर जरा नाराज दिसल्या.

“मी इथे भाषण नाही, तर पुनरावलोकन करुन आपल्या भावना सांगणार आहे. तुम्ही समर्थन दिलं. मात्र, या निवडणुकांमध्ये रायबरेलीच्या जनतेने सोनिया गांधी यांना जिंकवलं. लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी व्यवस्थित काम केलं नाही. हे ऐकायला वाईट वाटत असलं तरी खरं आहे. गेल्या निवडणुकांमध्ये सोनिया गांधी या 3.5 लाख मतांनी जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी त्या केवळ 1.67 मतांनी जिंकल्या”, असं प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं.

“तुमच्या पैकी कुणी प्रमाणिकपणे काम केलं आहे, हे तुम्हाला माहीत आहे आणि कुणी प्रामाणिकपणे काम केलं नाही त्यांचा शोध मी घेईल. निवडणूक एक संघटन लढत असते, हे मी नेहमी सांगितलं आहे. तयार व्हा, प्रामाणिकपणे काम करायचं असेल तर संघर्ष करावा लागेल”, असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.

काँग्रेसच्या चिंतन मंथन बैठकीत 2022 मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये चर्चा झाली. निवडणुकांमध्ये प्रियांका गांधी वाड्रा या मुख्यमंत्री पदाचा चेहरा असाव्या, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. तसेच आता पराजयाच्या विचारातून बाहेर पडत नव्या जोमाने एकत्रीत होण्याची गरज असल्याचं पक्षातील नेत्यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात 12 जागांवर निवडणुका पार पडतील. लोकसभा निवडणुकांमध्ये आलेला पराभव मागे सारत आता काँग्रेसने विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.

संबंधित बातम्या :

थँक्यू राजसाहेब : अमोल कोल्हे

शिवसेना नगरसेविकांची हाणामारी, नगरसेविकेविरुद्ध पोलिसात तक्रार

राहुल गांधींना 2004 पासून राहत असलेला सरकारी बंगला सोडावा लागणार

पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच, अमित शाहांच्या दाव्याने शिवसेनेची नाराजी?