या कारणांमुळे पुण्याचे खासदार अनिल शिरोळेंचा पत्ता कट होणार?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

पुणे : भाजपचे पुण्यातील खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट यावेळी कापलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी सध्या मंत्री असलेले गिरीश बापट यांच्या नावाची चर्चा आहे. पण आपण निवडणूक लढणार नसल्याचं गिरीश बापटांनी जाहीर केलंय. त्यामुळे पुण्यात भाजप नव्या उमेदवाराच्या शोधात आहे. पण अनिल शिरोळे यांचा पत्ता कट का केला जातोय हा प्रश्न सर्वांसमोरच आहे. यामागे […]

या कारणांमुळे पुण्याचे खासदार अनिल शिरोळेंचा पत्ता कट होणार?
Follow us on

पुणे : भाजपचे पुण्यातील खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट यावेळी कापलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी सध्या मंत्री असलेले गिरीश बापट यांच्या नावाची चर्चा आहे. पण आपण निवडणूक लढणार नसल्याचं गिरीश बापटांनी जाहीर केलंय. त्यामुळे पुण्यात भाजप नव्या उमेदवाराच्या शोधात आहे. पण अनिल शिरोळे यांचा पत्ता कट का केला जातोय हा प्रश्न सर्वांसमोरच आहे. यामागे अनेक कारणं सांगितली जातात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिरोळेंकडे कार्यकर्त्यांचं पाठबळ नसल्याचं बोललं जातं.

भाजपात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा एक आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक गट मानला जायचा. अनिल शिरोळे हे मुंडे गटाचे होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्याचा उमेदवार कोण हा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम होता. अखेर गोपीनाथ मुंडेंनी अनिल शिरोळेंचं नाव उमेदवार म्हणून जाहीर केलं. याला गडकरी गटाचे असलेल्या गिरीश बापटांचा विरोध असल्याचंही दिसून आलं होतं. पण भाजपने एकजुटीने ही जागा लढली आणि मोठ्या फरकाने विजयही मिळवला.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपात एकाकी पडलेले अनिल शिरोळे यांची मतदारसंघातील पकडही कमी झाली. पुणे महापालिका निवडणुकीत त्यांना स्वतःला सिद्ध करता आलं नाही आणि तिथूनच शिरोळेंचा पत्ता कट होण्याची सुरुवात मानली जाते. विशेष म्हणजे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार अनिल शिरोळे यांच्यातही फार सौख्य नाही. त्यामुळे ही दरी वाढतच गेली.

लोकांचीही नाराजी

अनिल शिरोळे यांचा जनसंपर्कही म्हणावा तसा राहिला नाही. लोकांमध्ये न मिसळल्याने लोकांचीही त्यांच्यावर नाराजी दिसून येते. लोकांची कामं न झाल्यामुळे मतदारसंघातील जनताच नाराज झाल्यामुळे शिरोळेंच्या अडचणी आणखी वाढल्या. पुण्यासाठी छातीठोकपणे सांगता येईल असा कोणताही निर्णय त्यांच्या काळात झाला नाही. संसदेतील त्यांची कामगिरीही म्हणावी तशी नाही. पीआरएसच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षात त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले फक्त 208 प्रश्न उपस्थित केले. तर 18 चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला. त्यांची संसदेतील हजेरी 93 टक्के होती. पण या उपस्थितीच्या काळात त्यांनी पुणेकरांचे प्रश्न उपस्थित केले नाही.

कार्यकर्त्यांचं पाठबळ नाही

कोणत्याही नेत्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी कार्यकर्त्यांचं पाठबळ अत्यंत महत्त्वाचं असतं. पण अनिल शिरोळेंमागे कार्यकर्त्यांचं मोठं पाठबळ नाही. संघटन मजबूत करता न आल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्तेही खासदारावर नाराज आहेत.