PMC election 2022 Ward 21: भाजप आपला गड राखणार का? यंदाच्या निवडणुकीत काय होणार?

| Updated on: Aug 07, 2022 | 5:31 PM

पुणे महापालिका आपल्याचकडे रहावी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांनी दंड थोपटले आहेत. तर अजित पवारांनी आपले संपूर्ण लक्ष हे या निवडणुकीवर केंद्रीत केले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीला खिंडीत अडवण्यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तर सेनेनेही आपले दोन सेनापती पुण्यात उतरवले आहेत. त्यामुळे पुण्याची ही महापालिका निवडणूक गाजणार हे नक्की.

PMC election 2022 Ward 21: भाजप आपला गड राखणार का? यंदाच्या निवडणुकीत काय होणार?
PUNE MNP WARD 21
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

पुणे: पुणे महापालिका प्रभाग रचनेनंतर प्रत्येक पक्षाकडून महापालिका काबीज करण्यासाठी जोर लावला जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरोधात भाजप असा थेट सामाना पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. तर यावेळी ही महापालिका भाजपच्या (BJP) ताब्यात होती. अनेक प्रश्नांमुळे भाजप अडचणीत आली होती. तर या निवडणूकीत भाजपला त्याच प्रश्नांवरून अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून रणनिती आखली जात आहे. पुणे महापालिका आपल्याचकडे रहावी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांनी दंड थोपटले आहेत. तर अजित पवारांनी आपले संपूर्ण लक्ष हे या निवडणुकीवर केंद्रीत केले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीला खिंडीत अडवण्यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तर सेनेनेही आपले दोन सेनापती पुण्यात उतरवले आहेत. त्यामुळे पुण्याची ही महापालिका निवडणूक गाजणार हे नक्की. वॉर्ड क्रमांक 21 (Ward No 21 Pune) मध्ये तर उत्सुकतेनं निवडणुकीची वाट पाहिली जातीये. या निवडणुकीत काय चमत्कार होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

2017 च्या महापालिका निवडणुकीत जिंकलेले उमेदवार

  • (21) अ -कोरेगांव पार्क घोरपडी – कांबळे नवनाथ विठ्ठल भारतीय जनता पार्टी
  • (21) ब – कोरेगांव पार्क घोरपडी – धायरकर लता विष्णु भारतीय जनता पार्टी
  • (21) क – कोरेगांव पार्क घोरपडी – मंत्री मंगला प्रकाश भारतीय जनता पार्टी
  • (21) ड – कोरेगांव पार्क घोरपडी – गायकवाड उमेश ज्ञानेश्वर भारतीय जनता पार्टी

वॉर्ड 21 एकूण लोकसंख्या

  • एकूण लोकसंख्या: 67574
  • अनुसूचित जाती – 11761
  • अनुसूचित जमाती – 756

वॉर्ड 21 A

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

वॉर्ड 21 B

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

वॉर्ड 21 C

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

वॉर्ड 21 मधील महत्त्वाची ठिकाणं

  • व्याप्ती : मुंढवा, घोरपडी, कोरेगांव पार्क, ओशो आश्रम, पासपोर्ट सेवा केंद्र, श्रावस्ती नगर, बालाजी नगर, निगडे नगर, डोंबीवाडा, कवडे मळा, नाला पार्क, साई पार्क, सिल्व्हर डेल हौसिंग सोसायटी, जाधव नगर, गुलमोहर कॉलनी, डेमको सोसायटी, रागविलास सोसायटी, राहुल सोसायटी, लिबर्टी सोसायटी, गंगा फॉर्म्युन सोसायटी, कवडेवाडी, मीरा नगर, इरीसन कॉलनी, क्लोव्हर पार्क, सेंट जोसेफ चर्च, दळवी नगर, वाडिया कॉलेज, जहांगीर हॉस्पिटल, मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर उद्यान, सेन्ट्रल एक्साईज कॉलनी, कॅनॉट प्लेस, अंजुमन ए इस्लाम शाळा, कोणार्क क्लासिक, जे. एन. पेटीट स्कूल, पॉप्युलर हाईट्स, मौलाना अबुल कलम आजाद मेमोरीयल हॉल, ब्लू डायमंड हॉटेल, भैरोबा पंपिंग स्टेशन, भोईराज हौसिंग सोसायटी, मुंढवा भाजी मंडई, लोणकर माध्यमिक विद्यालय, फ्लोरा व्हिलाज को. ऑप. सोसायटी, व्यंकटेश फ्लोरा सोसायटी, बडबन, मॅग्नस स्टार रेसिडेन्सी, मंत्री आंगण, गंगा ऑर्चीड, स्प्रिंग ब्लूम सोसायटी, सीटाडेल सोसायटी, गंगा क्वीन सोसायटी, सुरोभी रिजेन्सी, मदर तेरेसा पब्लिक पार्क, अमर | रेनीसांच, ला क्रेस्टा सोसायटी, एम्प्रेस गार्डन व्हू सोसायटी, अमर अॅबीयन्स, डोबरवाडी, श्रीनाथ नगर इ.
  • उत्तर : मुळा मुठा नदी बंडगार्डन पुलास जेथे मिळते तेथून पूर्वेस मुळा मुठा नदीने खराडी मुंढवा बायपास रस्त्यास मिळेपर्यंत.
  • पूर्व : मुळा मुठा नदी खराडी मुंढवा बायपास रस्त्यास जेथे मिळते तेथून दक्षिणेस खराडी मुंढवा बायपास रस्त्याने पुणे सोलापूर रेल्वे लाईनला मिळेपर्यंत.
  • दक्षिण : खराडी मुंढवा बायपास रस्ता पुणे सोलापूर रेल्वे लाईनला जेथे मिळतो तेथून पश्चिमेस पुणे सोलापूर रेल्वे लाईनने भारत फोर्ज च्या पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर हद्दीने भाग्यश्री नगर गल्ली क्र. १ ला मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर गल्लीने पाल्म ग्रूव्ह सोसायटीच्या वी१, बी२ व बी३ रो हाउसच्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर हद्दीने पाल्म ग्रो | सोसायटीच्या ए१, ए२ व ए३ रो हाउसच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने व पुढे पार्वती सदन इमारतीच्या उत्तरेकडील हद्दीने व पुढे दक्षिणेस पार्वती सदन इमारतीच्या पश्चिमेकडील हद्दीने पार्वती पार्क सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर हद्दीने बी. टी. कवडे रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस बी. टी. कवडे रस्त्याने जुन्या कालव्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिण पश्चिमेस मुठा जुन्या कालव्याने पुणे कॅन्टोन्मेंट च्या हद्दीस मिळेपर्यंत.
  • पश्चिम : मुठा जुना कालवा पुणे कॅन्टोन्मेंट च्या हद्दीस जेथे मिळतो तेथून उत्तरेस पुणे कॅन्टोन्मेंट च्या हद्दीने व पुढे पुणे सोलापूर रेल्वे लाईन ने जहांगीर हॉस्पिटलच्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने बंडगार्डन रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तर पूर्वेस बंडगार्डन रस्त्याने मुळा मुठा नदीस मिळेपर्यंत.