मावळमधून पार्थला उमेदवारी द्या, बिनशर्त पाठिंबा देऊ, शेकापची मागणी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी द्या, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पार्थ पवार हे मावळमधून लढल्यास लढत एकतर्फी होईल. शिवाय, पार्थ पवार हे समर्थ […]

मावळमधून पार्थला उमेदवारी द्या, बिनशर्त पाठिंबा देऊ, शेकापची मागणी
Follow us on

मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी द्या, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

पार्थ पवार हे मावळमधून लढल्यास लढत एकतर्फी होईल. शिवाय, पार्थ पवार हे समर्थ उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांना शेकापच्या सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

मावळ लोकसभा मतदरासंघाच्या अंतर्गत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि कर्जत लोकसभा मतदारंसघात शेतकरी कामगार पक्षाची प्रभावी ताकद आहे. त्यामुळे शेकपच्या पाठिंब्याला मोठं महत्त्व आहे.

मावळमध्ये पार्थ पवारांना उमेदवारी जवळपास निश्चित

मावळमध्ये कोण प्रतिस्पर्धी असणार?

शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. लक्ष्मण जगताप (भाजप), संजोग वाघिरे (राष्ट्रवादी कांग्रेस), माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे खासदार बारणे यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी असतील. त्यात पार्थ पवार यांचे आव्हान सगळ्यात कठीण मानले जात आहे. कारण पार्थ पवार यांचं आव्हान म्हणजे थेट अजित पवारांशी पंगा, अशी एकंदरीत स्थिती आहे. त्यामुळे जर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचे नाव पुढे आले, तर मोठमोठे उमेदवार सुद्धा उमेदवारीवर पुनर्विचार करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाची रचना आणि सद्यस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि रायगडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघांचा मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ बनला आहे.

  • पिंपरी (पुणे) – गौतम चाबुकस्वार, शिवसेना
  • चिंचवड (पुणे) – लक्ष्मण जगताप, भाजपा
  • मावळ (पुणे) – संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपा
  • कर्जत (रायगड) – आ. सुरेश लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
  • उरण (रायगड) – आ. मनोहर भोईर, शिवसेना.
  • पनवेल (रायगड) – आ. प्रशांत ठाकूर, भाजपा

पिंपरी चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील सहा मतदार संघाचा मावळ लोकसभा मतदार संघ बनलाय. त्यामुळे साहजिकच इथल्या समस्याही वेगळ्या आहेत. रायगड हा कोकणातला भाग आहे, त्यामुळे कोकणातल्या ज्या समस्या आहेत, त्याच समस्या इथल्या लोकांना आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या वेगळ्याच आहेत.