मावळमध्ये पार्थ पवारांना उमेदवारी जवळपास निश्चित

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनाच पुण्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचं जवळपास निश्चित झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ उपस्थित होते. या बैठकीत पार्थ यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली. पार्थ पवारांना उमेदवारी द्यावी, …

मावळमध्ये पार्थ पवारांना उमेदवारी जवळपास निश्चित

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनाच पुण्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचं जवळपास निश्चित झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ उपस्थित होते. या बैठकीत पार्थ यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली. पार्थ पवारांना उमेदवारी द्यावी, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ यांना उमेदवारी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सध्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार आहेत. त्यांच्याविरोधात  मावळ मतदारसंघासाठी पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. असं असलं तरी शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पार्थ पवार निवडणूक लढणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पार्थ यांचं नाव सातत्याने पुढे केलं जात आहे.

मावळमध्ये कोण प्रतिस्पर्धी असणार?

शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. लक्ष्मण जगताप (भाजप), संजोग वाघिरे (राष्ट्रवादी कांग्रेस), माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे खासदार बारणे यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी असतील. त्यात पार्थ पवार यांचे आव्हान सगळ्यात कठीण मानले जात आहे. कारण पार्थ पवार यांचं आव्हान म्हणजे थेट अजित पवारांशी पंगा, अशी एकंदरीत स्थिती आहे. त्यामुळे जर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचे नाव पुढे आले, तर मोठमोठे उमेदवार सुद्धा उमेदवारीवर पुनर्विचार करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाची रचना आणि सद्यस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि रायगडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघांचा मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ बनला आहे.

  • पिंपरी (पुणे) – गौतम चाबुकस्वार, शिवसेना
  • चिंचवड (पुणे) – लक्ष्मण जगताप, भाजपा
  • मावळ (पुणे) – संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपा
  • कर्जत (रायगड) – आ. सुरेश लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
  • उरण (रायगड) – आ. मनोहर भोईर, शिवसेना.
  • पनवेल (रायगड) – आ. प्रशांत ठाकूर, भाजपा

पिंपरी चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील सहा मतदार संघाचा मावळ लोकसभा मतदार संघ बनलाय. त्यामुळे साहजिकच इथल्या समस्याही वेगळ्या आहेत. रायगड हा कोकणातला भाग आहे, त्यामुळे कोकणातल्या ज्या समस्या आहेत, त्याच समस्या इथल्या लोकांना आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या वेगळ्याच आहेत.

संबंधित बातम्या

पार्थला डच्चू, मावळमधून आबांची कन्या लढणार? 

पार्थ पवार निवडणूक लढणार नाही, शरद पवारांची स्पष्टोक्ती

कोण पार्थ पवार? मी नाही ओळखत, पुढचा खासदार मीच : श्रीरंग बारणे 

मावळ लोकसभा : पार्थ पवारांच्या नुसत्या नावाने भल्याभल्यांची सपशेल माघार 

पवार कुटुंबातून 4 जण लोकसभा लढणार? अजित पवार म्हणतात…

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *