पार्थला डच्चू, मावळमधून आबांची कन्या लढणार?

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरु असताना, आता नवं नाव समोर आलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील या मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील, अशा चर्चा पुण्यासह राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. मात्र, निवडणूक लढण्याचा आपला अद्याप कोणताच विचार […]

पार्थला डच्चू, मावळमधून आबांची कन्या लढणार?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:19 PM

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरु असताना, आता नवं नाव समोर आलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील या मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील, अशा चर्चा पुण्यासह राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. मात्र, निवडणूक लढण्याचा आपला अद्याप कोणताच विचार नसल्याचे स्पष्टीकरण स्मिता पाटील यांनी दिले.

मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. किंबहुना, पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघात दौरेही सुरु केले होते. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या गुप्तभेटीही पार्थ पवार यांनी घेतल्या. मात्र, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले, “पवार कुटुंबातील माझ्याशिवाय कुणीही लोकसभा लढणार नाही” आणि पार्थ पवार यांच्या मावळमधील लढण्याच्या चर्चांना ब्रेक लागला.

आता दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांच्या नावाची चर्चा मावळसाठी सुरु झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. जर स्मिता पाटील या मावळमधून लोकसभेसाठी उतरल्या, तर श्रीरंग बारणे यांना मोठं आव्हान निर्माण होईल, असे म्हटले जात आहे. कारण आर. आर. आबांना मानणारा वर्ग महाराष्ट्रभर आहे. शिवाय, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. या सर्व गोष्टींचा फायदा स्मिता पाटील यांना मिळू शकतो, असा जाणकारांचा अंदाज आहे.

कोण पार्थ पवार? मी नाही ओळखत, पुढचा खासदार मीच : श्रीरंग बारणे

मावळ लोकसभा मतदारसंघाची रचना आणि सद्यस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि रायगडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघांचा मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ बनला आहे.

  • पिंपरी (पुणे) – गौतम चाबुकस्वार, शिवसेना
  • चिंचवड (पुणे) – लक्ष्मण जगताप, भाजपा
  • मावळ (पुणे) – संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपा
  • कर्जत (रायगड) – आ. सुरेश लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
  • उरण (रायगड) – आ. मनोहर भोईर, शिवसेना.
  • पनवेल (रायगड) – आ. प्रशांत ठाकूर, भाजपा

पिंपरी चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील सहा मतदार संघाचा मावळ लोकसभा मतदार संघ बनलाय. त्यामुळे साहजिकच इथल्या समस्याही वेगळ्या आहेत. रायगड हा कोकणातला भाग आहे, त्यामुळे कोकणातल्या ज्या समस्या आहेत, त्याच समस्या इथल्या लोकांना आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या वेगळ्याच आहेत.

हेही वाचा : मावळ लोकसभा : पार्थ पवारांच्या नुसत्या नावाने भल्याभल्यांची सपशेल माघार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें