मोदींच्या जन्मगावात शौचालय नाही, राज ठाकरेंकडून भाजपच्या योजनांची पोलखोल

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : महाडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार ग्रामीण योजनेतून दत्तक घेतलेल्या गावाची पोलखोल केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या जन्मगावाची म्हणजेच वडनगरचीही सत्यता समोर आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मगावात म्हणजे वडनगरमध्ये शौचालय नाहीत, मोदी जन्मलेल्या गावात जर अशी परिस्थिती असेल, तर देशाची परिस्थिती कशी असेल, असा प्रश्न राज ठाकरे यांनी भांडूपमधील सभेत विचारला. “पंतप्रधानांनी ‘स्वच्छ […]

मोदींच्या जन्मगावात शौचालय नाही, राज ठाकरेंकडून भाजपच्या योजनांची पोलखोल
Follow us on

मुंबई : महाडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार ग्रामीण योजनेतून दत्तक घेतलेल्या गावाची पोलखोल केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या जन्मगावाची म्हणजेच वडनगरचीही सत्यता समोर आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मगावात म्हणजे वडनगरमध्ये शौचालय नाहीत, मोदी जन्मलेल्या गावात जर अशी परिस्थिती असेल, तर देशाची परिस्थिती कशी असेल, असा प्रश्न राज ठाकरे यांनी भांडूपमधील सभेत विचारला.

“पंतप्रधानांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत 3 कोटी शौचालय बांधल्याचं जाहीर केलं. मात्र, त्यानंतर वडनगरमधील महिलांना उघड्यावर शौचास जावं लागतयं. या ठिकाणच्या महिला ओरडून सांगत आहेत की, शौचालय बांधा. मात्र, या ठिकाणी अद्याप कोणीही शौचालय बांधलेलं नाही”, अशी टीका राज ठाकरे यांनी मोदींवर केली.

राज ठाकरे यांच्या जाहीर सभांच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यातील पहिली सभा काल 23 एप्रिलला मुंबईतील अभ्युद्यनगर काळाचौकी येथे पार पडली. त्यानंतर आज भांडूप पश्चिमेच्या जंगलमंगल रोडवरील खडी मशीन येथे ही दुसरी सभा घेण्यात आली. नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड या ठिकाणच्या जाहीर सभेनंतर राज ठाकरे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या सभेतही मोदी-शाहांवर टीकास्त्र सोडलं.

भांडूपमध्ये झालेल्या राज यांच्या सभेत त्यांनी मोदींच्या गुजरातमधील जन्मगावाचा एक व्हिडीओ दाखवला. मोदींच्या गावात शौचालय नाहीत. त्या ठिकाणच्या महिला उघड्यावर शौचास जातात आणि देशभर मोदी स्वच्छता अभियानावर बोलतात. मोदी ज्या ठिकाणाहून आले, त्याच ठिकाणी अशी परिस्थिती असेल, तर देशाची परिस्थिती कशी असेल. हे लक्षात घ्या, असे राज ठाकरेंनी सांगितलं. तसेच, एका आठवड्यात साडे आठ लाख म्हणजेच मिनिटाला 84 आणि सेकंदाला 7 शौचालय बांधल्याच्या थापा मारणाऱ्या मोदींना बहुमत मिळाले. मात्र, त्यानंतरही पाच वर्षात विकास कामे केली नाहीत, अशीही टीकाही राज ठाकरे यांनी केली.

प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचं मोदी-शाहा समर्थन करतात

“मुंबईवर 26/11 ला झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे हे माझ्या शापाने मारले गेल्याची मुक्ताफळं उधळणाऱ्या साध्वी प्रज्ञाला भाजपकडून उमेदवारी का दिली गेली? अतिरेक्यांशी लढताना जे जवान शहीद झाले, त्यांच्या बद्दल असं बोलताना तिला काहीच वाटत नाही. हे बोल्यानंतर नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्याचे समर्थन करतात. तिला पाठिंबा देतात. यांना सत्तेचा माज आला आहे”, असेही राज ठाकरे म्हणाले.

मोदींची उज्वला योजनाही फसवी

‘डिजीटल गाव’, ‘मोदी फॉर न्यू इंडिया’ या योजनेची पोलखोल केल्यानंतर राज यांनी मोदींच्या ‘उज्वला योजने’चीही पोलखोल केली. यावेळी त्यांनी उज्वला योजनेची पहिली लाभार्थी आणि मोदींनी गौरवलेली महिला गुड्डी देवी, तसेच दुसरी लाभार्थी पोस्टर वुमन जरीना या दोघीही आज चुलीवर स्वयंपाक करत आहेत. स्वयंपाकाचा गॅस महाग असल्याने त्यांन तो घेणं परवडत नाही म्हणून त्यांनी उज्वला योजनेतून गॅस घेणे बंद केल्याचा व्हिडीओ राज यांनी स्क्रिनवर दाखवला. आघाडी सरकारच्या काळात घरगुती गॅस 410 रुपयाला मिळत होता, आता त्याची किंमत 800 रुपये आहे. यावरून आपल्याला फरक समजेल असेही राज ठाकरे म्हणाले.

किरीट सोमय्या गप्प का? 

2014 साली रेल्वे अपघातात दोन हात गमवावे लागलेल्या मोनिका मोरेलाही राज ठाकरे यांनी भांडूपच्या सभेत मंचावर बोलावलं. त्यावेळी मोनिकाच्या अपघाताचं भाजपने कसं भांडवलं केलं हेही राज ठाकरे यांनी सांगितलं. “मोनिकाच्या अपघातानंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या मुंबईतल्या रेल्वे स्थानकावरील उंची मोजत फिरत होते. तिच्या अपघाताचं भांडवलं करत होते. मात्र, त्यानंतर 2014 ते 2017 मध्ये म्हणजेच भाजप सत्तेत आल्यानंतर रेल्वे अपघातात दर दिवसाला 9 लोकांचा मृत्यू होतो. आता मात्र, किरीट सोमय्या या विषयावर मूक गिळून गप्प का?”, असा सवालही राज ठाकरे यांनी भाजपला केला.

पाहा व्हिडीओ :