AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज-उद्धव ठाकरे यांच्यात खास पद्धतीने होतोय संवाद, युतीच्या चर्चेविषयी मोठी माहिती समोर!

मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या युतीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा चालू आहे. असे असतानाच आता एक मोठी माहिती समोर आली आहे.

राज-उद्धव ठाकरे यांच्यात खास पद्धतीने होतोय संवाद, युतीच्या चर्चेविषयी मोठी माहिती समोर!
| Updated on: Jun 08, 2025 | 5:35 PM
Share

Uddhav Thackeray and Raj Thackeray Alliance : गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीची जोरदार चर्चा चालू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षातील काही नेत्यांनीही ही युती व्हायला हवी, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. ठाकरे गटानेही या युतीबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. असे असतानाच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंच्या युतीच्या चर्चेत आता ठाकरे कुटुंबाच्या नातेवाईकांची एन्ट्री झाली आहे.

नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांच्या युतीच्या चर्चेत आता त्यांच्या नेतेवाईकांची एन्ट्री झाली आहे. या दोन्ही भावांत नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद चालू आहे, असं सूत्रांनी सांगितलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अद्याप थेट संवाद चालू झालेला नाही, असंही सूत्रांनी सांगितलंय.

दोन्ही भावांत थेट चर्चा नाही

गेल्या काही महिन्यांत वेगवेगळ्या कौटुंबिक सोहळ्यांत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र पाहायला मिळाले होते. मात्र अद्याप या दोन्ही भावांत थेट चर्चा झालेली नाही, असं सूत्रांकडून कळतंय.

ठाकरे गट युतीसाठी सकारात्मक- किशोरी पेडणेकर

दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आमच्या बाजूने या युतीसाठी सकारात्मक आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलंय. 2022 साला महाराष्ट्रात राजकाराणाचा चिखल झाला. यामुळे नागरिक तसेच सगळ्यांनाच त्रास होत आहे. कारण परप्रांतीय लोकांचे प्राबल्य वाढत आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून ते आमच्यापर्यंत असे सगळेच लोक या युतीसाठी सकारात्मक आहोत. संजय राऊतांनी तर आता मागे वळून पाहायचं नाही, असं सांगितलं आहे. मागे वळून पाहिलं की चिखल दिसेल. त्यामुळे मागे पाहायचं नाही पुढे पाहुया, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे गट मनसेशी युती करायला सकारात्मक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्याच्या परिस्थितीकडे पाहून आगामी काळात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? तसेच ही युती झालीच तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली