Raj Thackeray Aurangabad Sabha : राज ठाकरेंनी राज्याच्या हिताचं बोलावं, द्वेष वाढेल, धर्मांधता वाढेल असं काही बोलू नका – विजय वडेट्टीवार

| Updated on: May 01, 2022 | 10:35 AM

राज ठाकरेंच्या आजच्या सभेला अतिप्रचंड गर्दी होईल. सभेला आज मोठ्या प्रमाणात लोक येतील. आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यानाच लागली आहे. आजच्या सभेमुळे शिवसेना नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे,त्यांनी या सभेचा धसका घेतला आहे.

Raj Thackeray Aurangabad Sabha : राज ठाकरेंनी राज्याच्या हिताचं बोलावं, द्वेष वाढेल, धर्मांधता वाढेल असं काही बोलू नका - विजय वडेट्टीवार
राज ठाकरेंनी राज्याच्या हिताचं बोलावं
Image Credit source: twitter
Follow us on

चंद्रपूर – राज्यात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण हे बोलताना राज्याच्या अस्मितेसाठी बोलायला हवं, बदनामीसाठी नव्हे. द्वेष वाढेल, धर्मांधता वाढेल असं काही बोलू नका, असा सल्ला राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिला आहे. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करायचा असेल तर, मंदिरात जाऊन करा. म्हणजे देवही पावेल आणि संकटही टळेल. मात्र कुणाच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणाल तर संकट आल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी राणा दाम्पत्याच्या लगावला आहे. राज (Raj Thackeray) यांनी आजच्या सभेतून राज्याला पुढे नेण्याचा, जातीय सलोखा टिकवण्याचा विचार द्यायला हवा. राज्य सरकारला काही सूचना करायच्या असतील तर अवश्य कराव्या. मात्र जातीय तेढ, द्वेष वाढवू नका असं आवाहनही वडेट्टीवार यांनी केलं आहे.

राज ठाकरेंच्या आजच्या सभेला अतिप्रचंड गर्दी होईल.

राज ठाकरेंच्या आजच्या सभेला अतिप्रचंड गर्दी होईल. सभेला आज मोठ्या प्रमाणात लोक येतील. आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यानाच लागली आहे. आजच्या सभेमुळे शिवसेना नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे,त्यांनी या सभेचा धसका घेतला आहे. जर शिवसेना असं म्हणतीये की ही सभा स्पॉन्सर आहे. तर मग एम आय एमचा खासदार आणि 27 नगरसेवक कसे निवडून येतात. मात्र आम्हाला कोणाला कॉपी करायचं नाहीये. राज ठाकरेंचं स्वतः चं असं एक वेगळं अस्तित्व आहे असा टोला नीतीन सरदेसाईंनी संजय राऊतांना लगावला. एमआयएमने परवानगी ही प्रशासनाकडून घ्यावी आम्ही थोडी परवानगी देणार आहोत. आमच्या सभेला लोकं उत्स्फूर्तपणे येतात आम्ही गोळा करून लोक आणत नाही अशी टीका नितीन सरदेसाईंनी असदुद्दीन ओवैसींवर केली आहे.

आजच्या सभेला कार्यकर्त्यांनी शांततेत यावं

महाराष्ट्रावरील आणि देशावरील कोरोनाचं संकट तुळजाभवानी दूर करेल एवढंच मागणं आहे. आजच्या सभेला कार्यकर्त्यांनी शांततेत यावं. आजच्या सभेतून महाराष्ट्राला आणि देशाला दिशा मिळेल. राज ठाकरे काय बोलणार ? यासाठी माझेही कान आतुर झाले आहेत. मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या इच्छा आकांक्षा यामध्ये असतील. राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार हे मी सांगू शकत नाही असं बाळा नांदगावकरांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा