राज ठाकरे पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

| Updated on: May 29, 2019 | 2:07 PM

Raj Thackeray Meets Sharad Pawar मुंबई : लोकसभा निकालानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भेटीगाठींना ऊत आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. गेल्या 48 तासांत ही भेट झाली. शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे सायंकाळी ही भेट झाली. सुमारे पाऊण तास चाललेल्या भेटीत अनेक राजकीय […]

राज ठाकरे पुन्हा शरद पवारांच्या भेटीला
Follow us on

Raj Thackeray Meets Sharad Pawar मुंबई : लोकसभा निकालानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भेटीगाठींना ऊत आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. गेल्या 48 तासांत ही भेट झाली. शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे सायंकाळी ही भेट झाली.

सुमारे पाऊण तास चाललेल्या भेटीत अनेक राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांच्या आघाडीत घेण्याच्या हालचाली आहेत. काल पक्षाच्या अनौपचारिक बैठकीत राज ठाकरे यांनी लोकसभा निकालांबाबत नेत्यांची मते जाणून घेतली.

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काल काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीची मंथन बैठक झाली. या बैठकीत पराभवाची कारणीमीमांसा तर करण्यात आली पण त्याचबरोबर विधानसभेला कसे सामोरं जायचं याचीही चर्चा झाली. विधानसभेला मनसेला बरोबर घ्यावं असा सूर महाआघाडीच्या नेत्यांचा होता.

राज-शरद पवार भेटीगाठी

दरम्यान, राज ठाकरे आणि शरद पवार यांची ही काही पहिलीच भेट नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी शरद पवारांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीतील रणनीती ठरल्याचं कळलं होतं. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर तुफान टीका केली होती. तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा झाला तर होऊ दे अशी थेट भूमिका घेतली होती.

शरद पवार-राज जवळीक, मनसेसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग

काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीनंतर शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीच्या गोटात सामील होऊ शकते अशी चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान मनसेला आघाडीत घेण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ यासारख्या बड्या नेत्यांनी केली. मात्र काँग्रेसने थेट विरोध केल्याने मनसेला प्रत्यक्ष आघाडीत सामील होता आलं नाही.

विधानसभेला मनसे आघाडीसोबत?

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आता मनसेला सोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भाजप-शिवसेना युतीला सामोरं जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

संबंधित बातम्या  

शरद पवारांची भेट घेऊन 15 मिनिटात राज ठाकरे बाहेर, अजित पवार आत    

राज ठाकरे आघाडीत या, अजित पवारांची हाक   

राज ठाकरेंसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग, आघाडीत घेण्याचे जोरदार प्रयत्न   

 राज ठाकरेंकडे हजारो मतं, फायदाच होईल: छगन भुजबळ