शरद पवारांची भेट घेऊन 15 मिनिटात राज ठाकरे बाहेर, अजित पवार आत

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. कालच राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन, लोकसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मोदी आणि शहा यांच्याविरोधात आपल्याला लढायचं आहे, अशी जाहीर भूमिका राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर, आज राज ठाकरे पुन्हा शरद पवारांच्या भेटीला गेले. त्यामुळे […]

शरद पवारांची भेट घेऊन 15 मिनिटात राज ठाकरे बाहेर, अजित पवार आत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. कालच राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन, लोकसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मोदी आणि शहा यांच्याविरोधात आपल्याला लढायचं आहे, अशी जाहीर भूमिका राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर, आज राज ठाकरे पुन्हा शरद पवारांच्या भेटीला गेले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचं लक्ष राज ठाकरे-शरद पवारांच्या भेटीकडे लागले.

शरद पवारांची भेट घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे निघाले, केवळ 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली, बंद दरवाज्याआड नेत्यांची चर्चा, अजित पवारही उपस्थित होते,भेटीचा तपशील मात्र गुलदस्त्यात आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यात राज ठाकरे यांनी भेट घेतली. तिथे शरद पवार यांच्याशी चर्चा केल. शरद पवार-राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय आणि या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

राज ठाकरे यांनी काल काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला उघड पाठिंबा दिला नसला, तरी अप्रत्यक्षरित्या आघाडीला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची आजची शरद पवार यांच्यासोबतची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे.

राज ठाकरे काल काय म्हणाले?

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका जाहीर केली आहे. युती किंवा आघाडी यामध्ये आपल्याला रस नसून फक्त मोदीमुक्त भारत हे ध्येय असल्याचं त्यांनी जाहीर केलं. यापुढच्या माझ्या सर्व सभा या मोदी-शाह यांच्याविरुद्ध असतील. येणारी लोकसभा निवडणूक ही मोदी-शाह विरुद्ध संपूर्ण देश अशी असेल, असंही राज ठाकरे म्हणाले.
  • राज ठाकरे यांनी आघाडीत यावं, असं काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले होते. यावरही राज ठाकरेंनी उत्तर दिलं. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांना भेटण्यासाठी बोलावलं. या भेटीमध्ये आपण कोणतीही अशी मागणी केली नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही हेच सांगितलं, असं राज ठाकरे म्हणाले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चौकीदार या मोहिमेवरही राज ठाकरेंनी टीका केली. मी चौकीदार हे कॅम्पेन सुरु आहे, इतका खालचा विचार कसा असू शकतो? या देशाची वाट लावल्याने चौकीदार हा फास पुढे केला जात आहे, त्यात अडकू नका, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
  • भाजप आणि मोदी-शाह यांच्या विरोधात प्रचार करा, महाराष्ट्र सैनिकांना आदेश आहे की तुम्ही ही जोडी सत्तेच्या बाहेर काढा. आत्ताची लढाई ही पक्षाशी नाही तर मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात आहे आणि म्हणूनच त्यांच्या उमेदवारांना मतदान न करणं आणि त्यांना मदत न करणं हाच उद्देश आहे, अशी भूमिका राज ठाकरेंनी जाहीर केली.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.