Raj Thackeray Sabha : ‘वसंत सेना ते शरद सेना असा प्रवास करणाऱ्यांनी आमच्याबद्दल बोलू नये ‘, संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला

| Updated on: Apr 12, 2022 | 7:24 PM

संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. 'शिवसैनिकांना वसंत सेना म्हटलं जायचं. तेव्हाची वसंत सेना ती आताची शरद सेना असा यांचा मोठा प्रवास आहे. त्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल बोलायचं नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय.

Raj Thackeray Sabha : वसंत सेना ते शरद सेना असा प्रवास करणाऱ्यांनी आमच्याबद्दल बोलू नये , संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला
संदीप देशपांडे यांची आदित्य ठाकरेंवर टीका
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज ठाण्यात उत्तर सभा होत आहे. या सभेत बोलताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. आम्ही संपलेल्या पक्षाबाबत मी उत्तर देत नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मनसेला जोरदार टोला लगावला होता. त्यावर संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. ‘शिवसैनिकांना वसंत सेना म्हटलं जायचं. तेव्हाची वसंत सेना ती आताची शरद सेना असा यांचा मोठा प्रवास आहे. त्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल बोलायचं नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय.

‘आदित्य ठाकरे म्हणाले की संपलेल्या पक्षांवर मी बोलत नाही. जरा शिवसेनेचा इतिहास आपण तपासून घ्या. याच शिवसेनेला वसंतसेना असं म्हटलं जायचं. वसंत सेना का म्हटलं जायचं? तर वसंतरावांनी त्या शिवसेनेला पुनर्जीवन दिलं होतं. मुंबई महाराष्ट्रापेक्षा वेगळी केली जाईल, असं सांगून, असं एक वक्तव्य करुन शिवसेनेला पुनरुर्जीवित करण्याचं काम वसंतरावांनी केलं, म्हणून तेव्हा वसंत सेना असं म्हटलं गेलं. तर त्यावेळची वसंतसेना ती आताची शरदसेना असा ज्यांचा मोठा प्रवास आहे, त्यांनी आमच्याबद्दल नाही बोलायचं. तुमच्यामध्ये तर स्पर्धा चालली आहे. काँग्रेस म्हणते सेना आमची बी टीम, राष्ट्रवादी म्हणतं आमची बी टीम. म्हणजे तुम्ही डोळा एकाला मारलं, प्रेम एका बरोबर केलं. लग्न एकाबरोबर आणि हनिमून चौथ्या बरोबर केलं आणि तुम्ही आम्हाला विचारणार प्रश्न? राजसाहेबांनी जी भूमिका घेतली ती ठामच घेतली आहे. त्यासाठी आम्ही कुणाचे दोन पैशाचे मिंदे नाही’, असं संदीप देशपांडे म्हणाले.

‘येत्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना संपलेली दिसेल’

शिवसेना हनुमान चालीसा लावल्यानंतर कधी डिवचायला लागली. मी हे समजू शकतो की कुठल्या तरी दुसऱ्या धर्माचं काहीतरी केलं, वेगळं काहीतरी केलं तर मी समजू शकतो. पण हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र लावलं की तुम्ही डिवचले जात असाल, म्हणजे तुमचा भगवा रंग शंका घेण्यासारखा आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्हा संपवायला निघालेले आहात, अशी जोरदार टीकाही देशपांडे यांनी शिवसेनेवर केलीय. तसंच येत्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना संपलेली दिसेल, असा दावाही त्यांनी केलाय.

‘आमची मुंब्राची म्हैस’

संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरही निशाणा साधला. मुंब्र्याची म्हैस असा उल्लेख करत देशपांडे यांनी आव्हाडांवर जोरदार हल्ला चढवला. ‘मी राजसाहेबांना हात जोडून विनंती करतो की दंगली भडकवू नका. तू आम्हाला शिकवणार? इशरज जहाला पाठिंबा देणार तुम्ही. अहजर गुरुली फाशी देऊ नका म्हणून पाठिंबा देणार तुम्ही, तुम्ही आम्हाला सांगणार दंगली भडकवू नका म्हणून… आम्ही सगळे प्रभ श्रीरामचंद्राचे सैनिक आहोत. आमच्या शेपटीला आग लावम्याचा प्रयत्न करु नका. तुमची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही. आमचं आव्हान आहे समोरासमोर या मग बघू, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलाय.

इतर बातम्या : 

ST Workers Strike : एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीतून पडळकर, खोतांचा हिस्सा किती? अतुल लोंढेंचा सवाल

UP MLC Election Result 2022 : चक्क वाराणसीत भाजप उमेदवाराची जमानत जप्त, माफियाच्या पत्नीला आमदारकी, यूपीत उलटफेर!