जो पाण्यातूनही तेल काढतो, निधी नसतानाही काम करतो, ते नाव आहे नितीन गडकरी : राजनाथ सिंह

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

लखनौ : लोकसभा निवडणुकीला आता काहीच दिवस उरले आहेत. त्यातच लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजप नेते मोठ्या प्रमाणात सभा आणि विकासकामांचे लोकार्पण करत आहेत. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राउंडवर डझनभर विकासकामांचा शुभारंभ झाला. राज्यातच नाही तर संपूर्ण देशात भाजप हिच ट्रिक वापरतो आहे. त्यातच देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह आणि […]

जो पाण्यातूनही तेल काढतो, निधी नसतानाही काम करतो, ते नाव आहे नितीन गडकरी : राजनाथ सिंह
Follow us on

लखनौ : लोकसभा निवडणुकीला आता काहीच दिवस उरले आहेत. त्यातच लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजप नेते मोठ्या प्रमाणात सभा आणि विकासकामांचे लोकार्पण करत आहेत. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राउंडवर डझनभर विकासकामांचा शुभारंभ झाला. राज्यातच नाही तर संपूर्ण देशात भाजप हिच ट्रिक वापरतो आहे. त्यातच देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लखनौमध्ये उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये रस्त्यांचा शुभारंभ केला. यावेळी राजनाथ सिंह यांनी गडकरींवर कौतुकाचा वर्षाव केला. “या विकास कामांचं संपूर्ण श्रेय हे नितीन गडकरी यांचं आहे. गडकरींकडे दूरदृष्टी आहे. ते जे म्हणतात ते करुन दाखवतात. जे पाण्यातूनही तेल काढतात, ते नितीन गडकरी आहेत. जे निधी नसतानाही काम करतात, ते नितीन गडकरी आहेत”, असे म्हणत राजनाथ सिंह यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले. यावेळी या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.

“मी अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना लखनौला एक जागतिक दर्जाचे शहर बनवायचे होते. 2014ला जेव्हा मी इथे निवडणुकीपूर्वी आलो होतो, तेव्हा मी कुठलंही आश्वासन दिलं नव्हतं. पण सरकार येताच 100 दिवसांत मास्टर प्लॅन तयार केला आणि त्यावर काम केले. त्यामुळे आता आपले लखनौ हे ‘Luck Now’ बनलं आहे”, असेही राजनाथ म्हणाले.

तर गडकरी म्हणाले की मी पूर्वीही लखनौला आलो होतो. मात्र, आजचं लखनौ हे बदललं आहे. तसेच गडकरींनी नागपूरचे उदाहरण देत म्हटले की, “आमच्याकडे सांडपाण्यापासून बायो सीएनजी तयार केली जाते. आता लवकरच हे उत्तर प्रदेशातही सुरु करु, यामुळे जल आणि वायू प्रदुषणापासून मुक्तता मिळेल.”

दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासूनचं नागपूरकरांचं मेट्रोचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय. नागपूरकरांचं आकर्षण असलेल्या नागपूर मेट्रोला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवत सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. नागपूर मेट्रो ही देशातील ग्रीन मेट्रो आहे. या मेट्रोसाठी सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. स्टेशन सुद्धा ग्रीन आणि ऐतिहासिक आहेत. कमी खर्च आणि कमी वेळात बनलेली ही मेट्रो आहे. नागपुरात वर मेट्रो आणि खाली उड्डाण पूल, त्या खाली रोड अशी व्यवस्था असलेली देशातील कदाचित पहिलीच सेवा  असावी, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.