रवी राणा, बच्चू कडू वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, राणा आज एकनाथ शिंदे यांना भेटणार

| Updated on: Oct 30, 2022 | 8:43 AM

गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये वाद सुरू आहे. आता हा वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

रवी राणा, बच्चू कडू वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, राणा आज एकनाथ शिंदे यांना भेटणार
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यामध्ये वाद सुरू आहे. हा वाद आता विकोपाला पोहोचला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर आरोप केले आहेत. बच्चू कडू यांनी राणांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना थेट राज्य सरकारलाच इशारा दिला आहे. रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करावेत अन्यथा एक तारखेला वेगळा निर्णय घेऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्याला सात ते आठ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही कडू यांनी केला आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवर हा वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये मधस्थी करणार आहेत.

रवी राणा घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मथ्यस्थी करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी रवी राणा हे अमरावतीहून रवाना झाले आहेत. ते आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना देखील भेटायला बोलावलं आहे. त्यामुळे लवकरच हा वाद मिटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

विरोधकांची टीका

दरम्यान दुसरीकडे रवी राणा आणि बच्चू  कडू यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादावरून विरोधकांकडून शिंदे गटावर निशाणा साधण्यात येत आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. खोके कोणाकडे किती पोहोचले यावरून आता आमदारांमध्ये भांडण सुरू झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.