
मुंबई : सांगली (Sangli) जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिग्गज नेते आहेत. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे (sangli gram panchayat election results) लागलं आहे. शिराळा (Shirala) तालुक्यातील महाराष्ट्राच्या राजकारणात तीन दिग्गज व्यक्ती आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि भाजपचे नेते सत्यजित देशमुख यांचा समावेश होतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
शिराळा तालुक्यात 13 ग्रामपंचायतींचा निकाल लागला असून राष्ट्रवादी 11, भाजप 2 आणि अपक्ष १ असा निकाल लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे.
माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपमध्ये त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा अशी घोषणा कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे.प्रवेश केला होता. परंतु त्यांचा निवडणुकीत पराजय झाला. त्यांना भाजपचे नेते सत्यजित देशमुख यांनी त्यावेळी चांगली साथ दिली होती. शिवाजीराव नाईक यांचा पराजय झाल्यानंतर त्यांनी पुन्हा जयंत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्याचा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर परिणाम होणार असं भाकित व्यक्त करण्यात आलं होतं. ते खरं ठरलं आहे.
शिराळा तालुक्यातील चरण गावात राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत आली आहे. भाजप गटाला फक्त एक जागा जिंकता आली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार उत्साह सुरु केला आहे. राष्ट्रवादीने 11 पैकी 10 जागा जिंकल्या.