उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का? संजय राऊत म्हणतात…

| Updated on: Jul 20, 2020 | 12:02 PM

राजकीय सोशल डिस्टन्सिंग ठेऊन कार्यक्रम कसा करता येईल, यावर न्यास निर्णय घेईल, असं उत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं.

उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का? संजय राऊत म्हणतात...
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला जाणार का हा प्रश्न सध्या विचारला जात आहे. “उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळाले का, याची चर्चा रंगली आहे. मात्र सध्या फक्त तारीख जाहीर झाली आहे. राजकीय सोशल डिस्टन्सिंग ठेऊन कार्यक्रम कसा करता येईल, यावर न्यास निर्णय घेईल” असं उत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं. (Sanjay Raut answers if Uddhav Thackeray going to Ayodhya for Ram Mandir Stone Foundation)

“उद्धव ठाकरे हे नेहमीच रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी जातात. ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते, तेव्हा गेले होते, मुख्यमंत्री झाले तेव्हा गेले. अयोध्या आणि शिवसेनेचं नातं कायम आहे ते काही राजकीय नातं नाही” असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का, याविषयी स्पष्टता नाही. पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

“राजकारणासाठी आम्ही अयोध्येत जात नाही. राम मंदिराचा पूर्ण रस्ता शिवसेनेने तयार केलेला आहे. मंदिरामध्ये येणारे मुख्य अडथळे होते ते शिवसेनेने दूर केले. राजकारण म्हणून नाही, तर श्रद्धा हिंदुत्व या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान दिलं. ते आमचं नातं कायम आहे” असं राऊत म्हणाले.

हेही वाचा : Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला

“उद्धव ठाकरे यांना निमंत्रण आलं की नाही, याची चर्चा मीडिया करत आहे. पण आता फक्त तारीख जाहीर झाली आहे. राजकीय सोशल डिस्टन्सिंग ठेऊन कार्यक्रम कसा करता येईल, यावर न्यास निर्णय घेईल” असं संजय राऊत म्हणाले.

“कोरोनाची लढाई ही पांढर्‍या कपड्यातले डॉक्टर लढत आहेत, तेवढेच आम्ही सांगू शकतो. धर्मावर, देवावर प्रत्येकाची श्रद्धा कायम असते. पण शेवटी उद्धव ठाकरेही सांगतील आणि पंतप्रधान देखील कबूल करतील आणि सगळेच कबूल करतील, की या देशातले नाही जगातले डॉक्टर, पोलीस, परिचारिका या सगळ्यांचे बलिदान गेलेले आहे आणि ही लढाई ते देवाच्या आशीर्वादाने लढतील” अशा शब्दात संजय राऊत यांनी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. मंदिर बांधल्याने कोरोना नष्ट होईल, असा टोला पवारांनी काल लगावला होता.

भाजपच्या दूधदर आंदोलनाविषयी मला काही माहीत नाही. त्यावर कृषिमंत्री बोलतील. त्यांना आंदोलन करायचे असेल, शेतकऱ्यांचा विषय आहे पण राज्य शासन दखल घेईल, असं राऊत म्हणाले. (Sanjay Raut answers if Uddhav Thackeray going to Ayodhya for Ram Mandir Stone Foundation)