AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस बॉम्ब घेऊन आले, तो भिजलेला लवंगी फटाका निघाला, त्याला वातही नव्हती; राऊतांची खोचक टीका

शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना दिलेल्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालाची अक्षरश: खिल्ली उडवली. (sanjay raut slams devendra fadnavis over transfer racket)

फडणवीस बॉम्ब घेऊन आले, तो भिजलेला लवंगी फटाका निघाला, त्याला वातही नव्हती; राऊतांची खोचक टीका
Sanjay Raut
| Updated on: Mar 24, 2021 | 11:01 AM
Share

नवी दिल्ली: शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना दिलेल्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालाची अक्षरश: खिल्ली उडवली. फडणवीस दिल्लीत बॉम्ब घेऊन आले होते. पण तो भिजलेला लवंगी फटका निघाला. त्याला वातही नव्हती, अशा शब्दात राऊत यांनी खिल्ली उडवली. तसेच अनिल देशमुख हेच राज्याचे गृहमंत्री राहणार असल्याचं स्पष्ट केलं. (sanjay raut slams devendra fadnavis over transfer racket)

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या बदल्यांच्या रॅकेट प्रकरणाची खिल्ली उडवली. दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांनी येत राहिलं पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते काल दिल्लीत आल्याचं कळलं. काही कागद घेऊन ते आले होते. ते कागदपत्रं काही गंभीर नव्हते. ते गंभीर आहेत की नाही हे सरकार ठरवेल. विरोधी पक्षनेत्याने गृहसचिवांना दिलेल्या अहवालात काडीचाही दम नाही. तो अहवाल जाहीर करण्यात यावा. तो नीट वाचा. त्यात सरकारला अडचणीत आणेल असं काहीच नाही. सरकारने काही चुकीचं केलं अशी एकही ओळ नाही, असं राऊत म्हणाले.

प्रशानसात विरोधकांचे निष्ठावंत

राज्यात जुन्या सरकारवर निष्ठा ठेवणारे काही अधिकारी असू शकतात. त्यांनी काही सहेतूने ती कागदपत्रं बनवली असतील, असा चिमटा काढतानाच विरोधी पक्षनेते काल बॉम्ब घेऊन आले होते. पण तो भिजलेला लवंगी फटाका होता. त्या फटाक्याला वातही नव्हती. आम्ही शोधत होतो हा बॉम्ब कुठे तरी फुटेल. पण त्यात दमच नव्हता. त्यामुळे तो फुटलाच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्रात खेला होबे

बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. बंगालमध्ये खेला होबे सुरू आहे. तसंच महाराष्ट्र आणि दिल्लीत खेला होबे सुरू आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचं मनोरंजन चांगलं होतं आहे. त्यावर मनोरंजन टॅक्सही देण्याची गरज नाही. टॅक्स फ्री आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

दिल्लीला भिजलेले फटाके फोडण्याची सवय

कोणत्याही अधिकाऱ्याचं आक्षेपहार्य संभाषण झालं असेल तर ते तपासायला मुख्यमंत्री सक्षम आहेत. त्यासाठी दिल्लीत जायची गरज नाही. विरोधी पक्षनेत्याने डेटाफाटा घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटावं. पुढचा शब्द मी सांगत नाही. या आपल्या घरातील गोष्टी असतात. त्या दिल्लीत जाऊन सांगायच्या नसतात. दिल्लीत असे भिजलेले फटाके वारंवार वात लावून फोडण्याची सवय आहेच, असा चिमटाही त्यांनी काढला.

सिंग यांच्या सांगण्यावरूनच महाराष्ट्रात सीबीआयला बंदी

आता विरोधकांचा कोणता सिनेमा बनतो आणि पडतो हे पाहायचे आहे. ज्या परमबीर सिंग यांच्या पत्रावरून गोंधळ सुरू आहे. त्याच सिंगांच्या आग्रहावरून सीबीआयला महाराष्ट्रात बंदी घातली आहे. पण परमबीर सिंगच सीबीआय चौकशीसाठी कोर्टात गेले आहेत. फडणवीस सुद्धा सीबीआय चौकशीसाठी दिल्लीत आले आहेत, असंही ते म्हणाले.

उत्तर प्रदेशातील बदली रॅकेटचं काय झालं?

उत्तर प्रदेशात वैभव कृष्ण नावाच्या अधिकाऱ्याने योगी सरकारच्या बदल्याचं रेटकार्डच दिलं होतं. 50 लाखांपासून एक कोटीची मागणी बदल्यांसाठी केली जात आहे, असल्याचं वैभव कृष्ण यांनी म्हटलं होतं. त्यावर केंद्राकडे कोणी गेलं नव्हतं. विरोधी पक्षानेही सरकारविरोधात केंद्रात तक्रार केली नव्हती. त्यामुळे अशा पत्रांचं काय होतं हे विरोधी पक्षनेत्यांना कळायला हवं. मी असे दहा पत्रं देऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. . (sanjay raut slams devendra fadnavis over transfer rack

सरकारमध्ये काही ठिकाणी भोकं पडली

सरकारमध्ये काही ठिकाणी भोकं पडली आहेत. माहिती जाण्यायेण्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. ते अधिकारी कोण आहेत हे शोधावं लागेल, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्यवेळी बाहेर येतील. जेव्हा येतील तेव्हा तोफगोळे आणि बॉम्ब घेऊन फिरणाऱ्यांमध्ये काहीच दम नसल्याचं स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले. तसेच खरं तर या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी बोलण्याची काहीच गरज नाही, त्यात बोलण्यासारखं काय आहे, असा सवालही त्यांनी केला. (sanjay raut slams devendra fadnavis over transfer racket)

संबंधित बातम्या:

LIVE | लवंगी फटाका की बॉम्ब लवकरच कळेल, फडवीसांचं संजय राऊतांना उत्तर

परमबीर सिंग प्रकरण भविष्यात भाजपवरच उलटल्याशिवाय राहणार नाही : संजय राऊत

धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घेण्याचं आवाहन

(sanjay raut slams devendra fadnavis over transfer racket)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?