LIVE | नवी मुंबईच्या अनेक भागात 25 आणि 26 मार्च दरम्यान पाणी पुरवठा बंद

| Updated on: Mar 26, 2021 | 6:21 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE  | नवी मुंबईच्या अनेक भागात 25 आणि 26 मार्च दरम्यान पाणी पुरवठा बंद
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Mar 2021 06:47 PM (IST)

    आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार, काँग्रेसला इतक्या जागा मिळणार?

    आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे.  भाजपला 73 जागा मिळण्याचा अंदाज असून  काँग्रेसला 50  जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

  • 24 Mar 2021 03:34 PM (IST)

    नवी मुंबईच्या अनेक भागात 25 आणि 26 मार्च दरम्यान पाणी पुरवठा बंद

    नवी मुंबई  –

    खारघर, तळोजा, उलवे, द्रोणागरी, JNPT वसाहत, JNPT बंदर चा पाणी पुरवठा बंद

    25 आणि 26 मार्च दरम्यान पाणी पुरवठा राहणार बंद

    सिडकोकडून हेटवणे धरणाच्या पाणी पुरवठा वाहिनीचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार

    दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतल्या मुळे पाणीपुरवठा राहणार बंद

    दुरुस्तीच्या कामानंतरही पाणीपुरवठा कमी दाबाने होणार

    नागरिकांनी पाण्याच्या साठा करून ठेवावा सिडकोकडून आवाहन

  • 24 Mar 2021 03:22 PM (IST)

    पुणे जिल्ह्यात होळी आणि धुळवड साजरी करायला बंदी

    पुणे

    जिल्ह्यात होळी आणि धुळवड साजरी करायला बंदी

    जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश

    सोसायट्यांच्या मोकळ्या जागेत, हॉटेल किंवा सार्वजनिक जागेत रंगपंचमी साजरी करता येणार नाही

    पुणे शहरासह जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय

  • 24 Mar 2021 03:21 PM (IST)

    बीडमध्ये बिबट्याच्या बछडा मृत अवस्थेत आढळला

    बीड -

    बिबट्याच्या बछडा मृत अवस्थेत आढळला

    पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी येथील घटना

    वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल

    बछड्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट

  • 24 Mar 2021 02:24 PM (IST)

    नागपुरातील भाजपच्या सर्व आमदारांनी घेतली पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट

    नागपुरातील भाजपच्या सर्व आमदारांनी घेतली पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट

    भाजप आणि युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरा समोर आंदोलन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले

    काही दिवसांपूर्वी युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवून वीज बिल संदर्भात निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता

    त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले होते

    गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांच्या हातात नावाच्या पाट्या देऊन पोलिसांनी फोटो काढले

    ही कारवाई बदलाच्या भावनेतून सरकार च्या दबावाने पोलीस करत आहे

    त्या संदर्भात दिले पोलीस आयुक्तांना निवेदन

  • 24 Mar 2021 02:23 PM (IST)

    शिर्डीत प्रवासी वाहतुकीपाठोपाठ आता कार्गो सेवा होणार सुरू

    प्रवासी वाहतुकीपाठोपाठ आता कार्गो सेवा होणार सुरू

    कोरोना काळात बळीराजाच्या मालाला मिळणार मोठी बाजारपेठ..

    शिर्डी विमानतळ प्राधिकरणाचा निर्णय...

    शिर्डी विमानतळ प्राधिकरणाला कार्गो सेवेसाठी मंजुरी...

    येत्या एक ते दोन दिवसात होणार कार्गो सेवा सुरू...

    सुरूवातीला मर्यादीत असणारी सेवा हळूहळू वाढविण्यासाठी करणार प्रयत्न...

    विमानतळाचे संचालक दिपक शास्री यांची माहीती ....

  • 24 Mar 2021 01:13 PM (IST)

    मुंबई अँटी नारकोटिक्स सेलच्या आझाद मैदान युनिटकडून नायजेरियन ड्रग्स पेडलरला अटक

    मुंबई अँटी नारकोटिक्स सेलच्या आझाद मैदान युनिटने आग्रीपाडा भागातून एका नायजेरियन ड्रग्स पेडलरला अटक केली

    पकडलेल्या ड्रग पेडलरकडून 500 ग्रॅम कोकेन जप्त, पकडलेल्या कोकेनचे मूल्य 1 कोटी 50 लाख रुपये आहे.

    आरोपींच्या विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवुन पुढील तपास सुरू

    आरोपींची नाव चिकुएमेन्का एनावानको असून वय 35 वर्षे आहे

  • 24 Mar 2021 12:27 PM (IST)

    नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंड भागात असलेल्या गांधी तलावातील चार बोटी अज्ञातांनी जाळल्या

    - नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंड भागात असलेल्या गांधी तलावातील चार बोटी अज्ञातांनी जाळल्या

    - आगीत चार ही बोटी पूर्णपणे जळून खाक

    - मध्य रात्रीच्या सुमारास घडली घटना,कारण मात्र अस्पष्ट

    - गाड्या जाळण्याच्या ट्रेंड नंतर आता बोटी जाळल्याने खळबळ

  • 24 Mar 2021 12:17 PM (IST)

    SC on Param Bir Singh Plea LIVE: हायकोर्टात का गेला नाही? सुप्रीम कोर्टाची परमबीर सिहं यांच्या वकिलांना विचारणा

    SC on Param Bir Singh Plea LIVE: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासमादेशक परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. परमबीर सिंह यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एसके कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या समोर सुनावणी होणार आहे. परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. तर, दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली रद्द करावी, अशी देखील मागणी याचिकेत करण्यात आलीय.

    परमबीर सिंह यांच्याकडून अ‌ॅड. मुकुल रोहतगी युक्तिवाद करत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली हा दुर्मीळ प्रकार असल्याचं रोहतगी म्हणाले. न्यायमूर्ती एसके कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांनी परमबीर सिंह यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

  • 24 Mar 2021 11:13 AM (IST)

    नागपुरात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरा समोर राष्ट्रवादी काँग्रेसच आंदोलन

    नागपूर -

    नागपुरात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरा समोर राष्ट्रवादी काँग्रेसच आंदोलन

    नागपुरातील आर्किटेकट एकनाथ निमगडे हत्या प्रकरण वरून आंदोलन

    2016 मधील आहे प्रकरण , सीबीआय करत आहे या प्रकरणाचा तपास

    राष्ट्वादी काँग्रेस चे नेते वेद प्रकाश आर्य यांच्या नेतृत्वात आंदोलन

    आंदोलनात काही मोजके लोक सहभागी

    मात्र पोलिसांनी लावला मोठा बंदोबस्त

  • 24 Mar 2021 11:04 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांचे मौन हे चिंताजनक - फडणवीस

    ज्या प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसात बाहेर येतात, हे अत्यंत चिंताजनक आहे. या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे मौन हे चिंताजनक आहे.

    शरद पवारांनी दोन प्रेस घेतल्या. पण त्यांनी पाठीशी घातलं

    काँग्रेस अस्तित्वहीन आहे. त्यांची काहीही भूमिका नाही. त्यांचे नेते दिल्लीत एक आणि इथे वेगवेगळं बोलतं आहे.

    महाविकासआघाडीने सर्व नैतिकता पायाखाली तुडवली आहे. केवळ सत्तेसाठी या ठिकाणी हे सर्व काम चाललं आहे. त्यापलीकडे काहीही नाही.

    काँग्रेसला किती हिस्सा आणि वाटा मिळतो हे सांगावे. राज्यपालांना वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यापालांनी बोलत करावं. खंडणीच्या घटनेत काय कारवाई केली. याबाबतचा अहवाल घेतला पाहिजे.

  • 24 Mar 2021 11:00 AM (IST)

    ...तर माझ्यावर गुन्हा दाखल करा - फडणवीस

    देवेंद्र फडणवीस -

    हे प्रकरण मी बाहेर आणलं, हा गुन्हा असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा मला त्याचा काहीही फरक पडत नाही

    हप्तेगिरी होत असेल, तर मी महाराष्ट्राची बदनामी होऊ देणार नाही

    राज्याला वाचवण्यासाठी, राज्याच्या हितासाठी मी असे आणखी गुन्हे करेन

    गुन्हा दाखल करायचा असेल तर करा मी न्यायालयात सर्व सिद्ध करेन

  • 24 Mar 2021 10:55 AM (IST)

    राज्यपालांना भेटल्यानंतर भाजपची पत्रकार परिषद

    राज्यपालांना भेटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद

    लवंगी फटाका की बॉम्ब लवकरच कळेल

    लवंगी फटाका होता तर अहवाल दाबून का ठेवला

  • 24 Mar 2021 10:24 AM (IST)

    फडणवीसांच्या आरोपांमध्ये काहीही नाही - संजय राऊत

    फडणवीसांच्या आरोपांमध्ये काहीही नाही

    सरकार अडचणीत येतील असं अहवालात काहीही नाही

    त्या अहवालाला काडीची किंमत नाही

    भिजलेले फटाके वारंवार दिल्लीत फुटतात

    - संजय राऊत

  • 24 Mar 2021 09:53 AM (IST)

    पुण्यातील लष्कर भरती आर्मी रिलेशन पेपर भरतीचं बारामती ,फलटण कनेक्शन

    पुणे -

    - पुण्यातील लष्कर भरती आर्मी रिलेशन पेपर भरतीचं बारामती ,फलटण कनेक्शन

    - बारामतीमधील किशोर गिरी आणि ज्ञानेश्वर परदेशीनं लष्कर भरतीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करण्याची पार पाडली जबाबदारी,

    - पोलीस तपासात दोघांनीही घोटाळ्यात महत्वाची भूमिका बजावल्याचं आलं समोर ...

    - किशोर गिरि आणि ज्ञानेश्वर परदेशी चालवत होते सैन्य भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र,

    - किशोर गिरीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या मात्र ज्ञानेश्वर परदेशी अजूनही फरार !

    - सातारा, फलटण , पुसेगाव,बारामती येथील सैन्य भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्रांची तपासणी होण्याची शक्यता,

    - आतापर्यंत पुणे पोलीसांकडून 11 मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलीये ,

    - कोणकोणत्या प्रशिक्षण केंद्रात असे प्रकार सुरू होते याचा तपास करणार पोलीस

  • 24 Mar 2021 09:14 AM (IST)

    एनसीबीने एका कॉलेज विद्यार्थ्याला ड्रग्स पुरवण्याच्या आरोपाखाली अटक केली

    मुंबई -

    एनसीबीने एक कॉलेज विद्यार्थ्याला ड्रग्स पुरवण्याच्या आरोपाखाली अटक केली

    मुंबईच्या वांद्रे भागात त्याच्या घरी छापा टाकून अटक केली

    हा विद्यार्थी बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मुंबईच्या उपनगरी भागात राहणया लोकांना ड्रग्स पुरवठा करत होता

    लोकडाउनच्या काळात आरोपीने ड्रग विकण्याची केली होती शुरुआत

    आरोपीने अधिकाऱ्यांना घबरविन्यासाठी आणि कार्रवाई रोखण्यासाठी एनसीबी टीमवर सोडले होते कुत्रे

    तरी देखील न घाबरता एनसीबी ने केली कार्रवाई आरोपीला केली अटक

  • 24 Mar 2021 09:04 AM (IST)

    पुण्यातील 216 कोटी रुपयांच्या निष्क्रिय बँक खात्यातील पैसे वर्ग करण्याच्या घोटाळा प्रकरणातील 13 जणांचा जामीन मंजूर

    पुणे -

    पुण्यातील 216 कोटी रुपयांच्या निष्क्रिय बँक खात्यातील पैसे वर्ग करण्याच्या घोटाळा प्रकरणातील 13 जणांचा जामीन मंजूर,

    न्यायालयाने 13 जणांची 25 हजाराच्या जातमुचलक्यावर केली मुक्तता

    पुणे सायबर व आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणात 14 जणांवर केली होती कारवाई

    मात्र एका आरोपीला न्यायालयाने तपासासाठी न्यायालयीन कोठडी दिल्यानं मिळाला नाही जामीन,

    यातील मुख्य सुत्रधार रविंद्र मंकणी आणि अनघा मोडक या दोघांसहित आणखी 11 जणांना मिळाला जामीन,

    सुधीर शांतीलाल भटेवरा उर्फ ( जैन ) याच्या जामीनावर आज होणार सुनावणी ....

  • 24 Mar 2021 08:39 AM (IST)

    नागपुरातील पेंच व्याघ्र प्रकल्पात कुजलेल्या वाघाचा मृतदेह आढळून आला

    नागपूर -

    विदर्भात दोन वाघांचा मृत्यू

    नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात एक कुजलेल्या वाघाचा मृतदेह आढळून आला

    तर दुसरी घटना यवतमाळ जिल्ह्यातील आसन शिवारातील आहे

    त्या ठिकाणी सुद्धा एक वाघ मृतावस्थेत आढळला

    गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडत असल्याने चिंता वाढली

    एकीकडे सरकार व्याग्र संवर्धनावर मोठा खर्च करते तर दुसरी कडे अश्या प्रकारे सतत मृत्य होत आहे

  • 24 Mar 2021 08:24 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती आणि फळपिकांचे नुकसान

    अमरावती -

    अमरावती जिल्ह्यात 18 ते 20 मार्च या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 14, 994 हेक्टर 70 आर क्षेत्रामधील शेती आणि फळपिकांचे 33 टक्क्यांवर नुकसान झाले

    एका व्यक्तीसह चार गुरे दगावली

    20 घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे

    यामध्ये सर्वाधिक 11,688 हेक्टरवरील संत्र्याच्या मृग बहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

  • 24 Mar 2021 07:23 AM (IST)

    सटाणा, बागलाण पाठोपाठ नांदगावच्या काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटचा धुमाकूळ

    मनमाड -

    सटाणा, बागलाण पाठोपाठ नांदगावच्या काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटचा धुमाकूळ

    उभी पिके झाली आडवी

    कांदा पिक आणि फळबागाचे झाले मोठे नुकसान तर वादळी वाऱ्यामुळे झाडे कोलमडली

    काही घरांची छप्पर देखील गेली उडून

    बळीराजा सोबत सर्वसामान्य नागरिकही आला संकटात

  • 24 Mar 2021 07:14 AM (IST)

    हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे विजेच्या कडकडाटसह अवकाळी पावसाला सुरुवात

    हिंगोली-

    जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे विजेच्या कडकडाटसह अवकाळी पावसाला सुरुवात

    अचानक आलेल्या वादळी वाऱ्या मुळे व पावसाने शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

    कापून टाकलेल्या गहू, हरबरा पिकांसह इतर पिकांच ही मोठ नुकसान

  • 24 Mar 2021 06:45 AM (IST)

    गुजरात 2006 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मोहसीन पूनावालाला अटक

    पुणे -

    गुजरात-अहमदाबादच्या कालुपुरमध्ये झालेल्या 2006 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मोहसीन पूनावाला याला गुजरात एटीएसने वानवडी पोलिसांच्या मदतीने काल रात्री उशिरा अटक केली आहे

    सोळा वर्ष फरार असलेला अब्दुल गाजी गुजरात एटीएसच्या हाती लागल्यानंतर मोहसीन ची माहिती पुढे आली होती त्यानंतर गुजरात एटीएस ने ही ही कारवाई केली आहे

    हा बॉम्बस्फोट घडवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर एजन्सी आयएसआयला गाजी आणि मोहसिन यांनी मदत केली होती आणि देशविघातक कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर होता

  • 24 Mar 2021 06:24 AM (IST)

    शिरोळ तालुका शिवसेना प्रमुख वैभव उगळे यांचे नावे एका हॉटेलात आले बॉम्ब सदृश्य पार्सल

    इचलकरंजी -

    शिरोळ तालुका शिवसेना प्रमुख वैभव उगळे यांचे नावे एका हॉटेलात आले बॉम्ब सदृश्य पार्सल

    नेमके पार्सल मध्ये बॉम्ब की अन्य काही पोलीस यंत्रणा गतिमान

    सदर पार्सल सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित मैदानावर पोलिसांनी हलविले

    तालुक्यात जयसिंगपूर पायोस हॉस्पिटलच्या बॉम्ब अफवा प्रकरण ताजे असताना कुरुंदवाडात खळबळ माजलीय.

Published On - Mar 24,2021 8:53 PM

Follow us
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.