धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घेण्याचं आवाहन

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. याआधी जून 2020 मध्ये मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घेण्याचं आवाहन
धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 11:43 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. याआधी जून 2020 मध्ये मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. पुढे कोरोनामुक्त होऊन ते राजकारणात सक्रियही झाले होते.(Dhananjay Munde corona positive for the second time)

“माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी”, असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी बुधवारी रात्री केलंय.

जून 2020 मध्ये कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

यापूर्वी 12  जून 2020 रोजी धनंजय मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 22 जून 2020 रोजी कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. रुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते.

रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना (Rashmi Thackeray) कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आलीय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरेंनाही कोरोनाची लागण झालीय. त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन होणार आहेत. रश्मी ठाकरे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनाही कोरोना

गेल्या काही दिवसांपासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना फोफावत आहे. आता तर हा कोरोना थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात शिरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढलीय.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 28 हजार 699 रुग्ण, मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ!

लोकल प्रवासावर पुन्हा निर्बंध येणार? आरोग्य मंत्री राजेश टोपेंचं मुंबई लोकलबाबत मोठं विधान

Dhananjay Munde corona positive for the second time

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.