गद्दारीची बीजे किती वर्षांपासून पेरली जात होती?, संजय राऊत यांनी सांगितलं

| Updated on: Apr 09, 2023 | 11:07 AM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. अयोध्या दौऱ्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गेलेत.

गद्दारीची बीजे किती वर्षांपासून पेरली जात होती?, संजय राऊत यांनी सांगितलं
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : काँग्रेस पक्ष देशात मोठा आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. ते वज्रमुठ सभेला व्यासपीठावर उपस्थित होते. फक्त नाना पटोले नव्हते. त्यांचे अंतर्गत विषय असतील. नाना पटोले म्हणतात, मी सुरतला गेलो. मी दिल्लीला गेलो. हायकमांडने बोलावलं. गेले असतील कामासाठी मी त्यावर काय बोलणार, असं संजय राऊत म्हणाले. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावार जोरदार हल्लाबोल केला. अयोध्या दौऱ्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गेलेत.

बेईमानीची आणि गद्दारीची बीज ही गेल्या साडेतीन-तीन वर्षांपासून रुजवली जात होती. माझ्या माहितीनुसार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना हा प्रकार झाला. तेव्हा ते सर्व लोकं अहमद पटेल यांना भेटून पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. अहमद पटेल यांच्याकडे यांच्या बैठकाही झाल्या होत्या. यांच्या डोक्यातला बेईमानीचा किडा हा जुना आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

गौतम अदानी यांच्यावर कारवाई का नाही?

उद्योगपती गौतम अदानी यांच्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक उद्योगपतींना मोदी सरकारने तुरुंगात टाकले आहे. अनेक महत्त्वाचे उद्योगपती आता तुरुंगात आहेत. त्यांनीही काही गुन्हे गौतम अदानी सारखीचं केले. मग, अशा प्रकारची कारवाई अदानी यांच्यावर का नाही, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मोदींमुळे अदानी यांची भरभराट

या देशातील प्रमुख उद्योगपती आणि काही राजकीय नेत्यांना टार्गेट केले जाते. मुद्दाम अदानी यांना मोकळं सोडलं जाते. लोकांच्या मनात हा संभ्रम आहे. जो न्याय गौतम अदानी यांना दिला जातो तसा न्याय इतर उद्योगपतींना द्या. गौतम अदानी टार्गेट आहेत कारण ते मोदी यांचे जवळचे मित्र आहेत. मोदी यांच्यामुळे त्यांची भरभराट झाली, असा आरोप संजय राऊत यांनी लावलाय.

हा प्रश्न शरद पवार यांनी विचारावा

गौतम अदानी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले आहे. तुमच्याकडे काय दुधाने आंघोळ करतात का. अनेक उद्योगपती तुरुंगात आहेत. मग, तोच न्याय तोच कायदा गौतम अदानी यांच्याबाबतीत का नाही. हा प्रश्नसुद्धा शरद पवार यांनी विचारायला हवा, अशी विनंती संजय राऊत यांनी केली.