Satej Patil : फडणवीसांना बाजूला सारून कोणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं? सतेज पाटलांनी सगळंच काढलं

गोकुळ दूध संघाच्या निवडीनंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना सतेज पाटील यांनी २०१९ नंतरच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर मोठं विधान केलं. फडणवीसांना बाजूला सारून कोणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, असा सवाल त्यांनी केला.

Satej Patil : फडणवीसांना बाजूला सारून कोणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं? सतेज पाटलांनी सगळंच काढलं
satej patil reply to chandrakant patil over cm post
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 10, 2026 | 6:16 PM

कोल्हापूर दुध संघाच्या अध्यक्षपदी आता महायुतीचे अध्यक्ष राजेश पाटील असणार आहेत. महायुतीने गोकुळ ताब्यात घेतलं आहे. अध्यक्ष निवडीनंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यापुढील भूमिका काय असणार याबद्दल त्यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

महायुतीच्या सभेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, बंटी पाटलांचा स्वभावच असा आहे की ते ज्यांना सोबत घेतात, त्याना पायाखाली घेतात आणि त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे पण त्यासाठी तेवढी समज लागते. त्यांच्या या विधानावर सतेज पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

Loading...

ते म्हणाले की, ते बोलले बरं झालं. मुख्यमंत्री व्हायचं वगैरे बोलले ते ऐकून बरं वाटलं, असा मिश्किल टोला सतेज पाटलांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. यानंतर पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की मला काही आकांक्षा, इच्छा नाही. मला त्याबाबतीत काही चर्चा करायची नाही. पण मी राजकारणात आज तीस वर्ष काम करतोय. या सगळ्या काळामध्ये मी सर्वांना बरोबर घेऊनच काम केलं आहे. तसा प्रयत्नही माझा असतो.

आता मी बोललो तर फार पुढे जाईल. मागच्या २०१९ नंतर कोणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. देवेंद्र फडणवीसांना बाजूला सारून कोणाला व्हायचं होतं, अरे हे आम्हालाही माहिती आहे. राज्य स्तरावचे, देशपातळीवरचे विषय आम्हीही जाणतो, असं यावेळी सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us