AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचं ‘सीटिंग गेटिंग’ तत्व, 50 उमेदवार आज जाहीर करणार, संभाव्य 39 नावं टीव्ही 9 च्या हाती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly election 2019) पार्श्वभूमीवर काँग्रेसची पहिली उमेदवार यादी (Congress Candidate List)  आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचं 'सीटिंग गेटिंग' तत्व, 50 उमेदवार आज जाहीर करणार, संभाव्य 39 नावं टीव्ही 9 च्या हाती
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 21, 2019 | 11:36 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly election 2019) पार्श्वभूमीवर काँग्रेसची पहिली उमेदवार यादी (Congress Candidate List)  आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत (Congress Candidate List) बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची चिन्हे आहेत. आज 50 जणांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, रमेश बागवे, प्रणिती शिंदे यांची नावं जवळपास निश्चित मानली जात आहे.

‘सीटिंग गेटिंग’ या तत्त्वानुसार सर्व आमदारांना काँग्रेस तिकीट देणार आहे. आज पहिली तर  26 तारखेला काँग्रेसची दुसरी यादी येईल, असं काँग्रेसच्या छाननी समितीचे सदस्य आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, दोन्ही पक्ष 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या सीटिंग गेटिंग तत्वानुसार विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार हे निश्चित आहे. 2014 मध्ये काँग्रेसचे 42 आमदार निवडून आले होते. मात्र त्यापैकी अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेषत: राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

काँग्रेसची संभाव्य यादी

  1. वसंतराव चव्हाण – नायगाव (नांदेड)
  2. प्रा. वीरेंद्र जगताप- धामणगाव रेल्वे (अमरावती)
  3. अमित झनक रिसोड – (वाशिम)
  4. अॅड. यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती)
  5. संतोष टारफे कळमनुरी – (हिंगोली)
  6. संग्राम थोपटे- भोर (पुणे)
  7. बाळासाहेब थोरात- संगमनेर (अहमदनगर)
  8. अमित विलासराव देशमुख- लातूर शहर (लातूर)
  9. सुरुपसिंह नाईक- नवापूर (अ.ज) (नंदुरबार)
  10. अमिन पटेल मुंबादेवी – (मुंबई)
  11. काशिराम पावरा- शिरपूर (अ.ज) (धुळे)
  12. कुणाल पाटील- धुळे ग्रामीण (धुळे)
  13. बसवराज पाटील- औसा (लातूर)
  14. अॅड. के. सी. पाडवी- अक्कलकुवा (अ.ज) (नंदुरबार)
  15. गोपालदास अग्रवाल- गोंदिया
  16. धनाजी अहिरे- साक्री (अनुसूचित जमाती) – धुळे
  17. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम- पलूस-कडेगाव – सांगली
  18. रणजीत कांबळे- देवळी – वर्धा
  19. अमर शरदराव काळे- आर्वी – वर्धा
  20. सुनिल छत्रपाल केदार- सावनेर – नागपूर
  21. नसीम मोहम्मद आरीफ खान- चांदीवली – मुंबई
  22. वर्षा एकनाथ गायकवाड – धारावी, मुंबई (अ जा)
  23. अशोकराव चव्हाण – भोकर – नांदेड
  24. पृथ्वीराज चव्हाण- कराड दक्षिण, सातारा
  25. मधुकरराव चव्हाण- तुळजापूर, उस्मानाबाद
  26. त्र्यंबकराव भिसे- लातूर ग्रामीण (लातूर)
  27. आसिफ शेख – मालेगाव मध्यम (नाशिक)
  28. विजय वडेट्टीवार- ब्रह्मपुरी (चंद्रपूर)
  29. प्रणिती शिंदे सोलापूर शहर – (सोलापूर)
  30. अस्लम शेख – मालाड पश्चिम (मुंबई)
  31. हर्षवर्धन सपकाळ – बुलडाणा (बुलडाणा)
  32. दत्तात्रय सावंत – नांदेड उत्तर (नांदेड)
  33. कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील
  34. करवीर- पी.एन.पाटील
  35. शहादा -पद्माकर वळवी
  36. नागपूर उत्तर -नितीन राऊत
  37. मीरा भाईंदर- मुजफ्फर हुसेन
  38. पुणे कन्टोन्मेंट- रमेश बागवे
  39. कल्याण काळे – फुलंब्री

संबंधित बातम्या 

Congress MLA List 2014 | महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांची संपूर्ण यादी   

महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघ   

SHIVSENA MLA List 2014 | महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांची यादी 2014  

BJP MLA List 2014 | महाराष्ट्रातील भाजप आमदारांची यादी 2014   

NCP MLA List 2014 | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यादी

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली