एकदम ok नंतर शहाजी बापूंचा चकवा व्हायरल

| Updated on: Sep 12, 2022 | 12:19 AM

बास्केटबॉल, हॉलीबॉल अशा खेळांमध्ये चकवा देत संघ विजयी होत असतात. राजकारणात देखील आम्ही चकवा देत असतो. चकवा देणं हा आमचा धंदा आहे असं शहाजी बापू पाटील यांनी म्हंटले आहे.

एकदम ok नंतर शहाजी बापूंचा चकवा व्हायरल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सोलापूर : काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल… एकमदम ok… या एका डायलॉगमुळे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील(Shahaji Bapu Patil) रातोरात फेमस झाले. त्यांचा हा डायलॉग तुफान फेमस झाला. इतकच नाहीतर विरोधक देखील त्यांच्या एकमदम ok या डायलॉगचा टीका करण्यासाठी वापर करत आहेत. आता शहाजी बापू आता त्यांच्या आणखी एका डायलॉगबाजीमुळे चर्चेत आले आहेत.

बास्केटबॉल, हॉलीबॉल अशा खेळांमध्ये चकवा देत संघ विजयी होत असतात. राजकारणात देखील आम्ही चकवा देत असतो. चकवा देणं हा आमचा धंदा आहे असं शहाजी बापू पाटील यांनी म्हंटले आहे.

चकवा बसला तर गुलाल आणि हुकला तर पाच वर्षे घरात बसायची तयारी असते अशी मिश्किल टिपण्णी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. सांगोला येथील बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यानंतर आमदार शहाजी बापू यांचा राजकीय चकवा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कराड येथील कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला. आपल्या कॉलेज जीवनात सैनिकी स्कूल मधून येणारे विद्यार्थी हॉलीबॉल ,बास्केटबॉल असे खेळ खेळायचे असं म्हणत ते जुन्या आठवणीत रमले.

आम्ही मात्र कबड्डी, खो-खो अशा मैदानी आणि देशी खेळांमध्ये रममाण होत असे. अशा खेळांमध्ये अनेक गमतीजमती असायच्या असे सांगत आमदार शहाजीबापूंनी तुफान विनोदी फटकेबाजी केली. सांगोला येथील बापूसाहेब झपके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.