अर्थसंकल्पातून सर्वांना न्याय देण्याची भूमिका, विरोधकांना टीका करु द्या, Shambhuraj Desai यांचं टीकास्त्र

| Updated on: Mar 17, 2022 | 8:41 PM

देवेंद्र फडणवीस यांचं सातत्याने आरोप करणं हे गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. ते आरोप करतात पुढे काय होतं हे आपल्याला माहिती आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले.

अर्थसंकल्पातून सर्वांना न्याय देण्याची भूमिका, विरोधकांना टीका करु द्या, Shambhuraj Desai यांचं टीकास्त्र
मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गावर वाहन चालवताना सावधान; वाहन चालवताना बेशिस्तपणा दिसल्यास तात्काळ कारवाई
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी टीव्ही 9 मराठीशी सातारा येथे संवाद साधला. यावेळी त्यांनी टीआरपी रेटींगमध्ये टीव्ही 9 मराठी पहिल्या क्रमांकावर आल्यानं सदिच्छा दिल्या. देसाई यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सातत्याने आरोप करणं हे गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. ते आरोप करतात पुढे काय होतं हे आपल्याला माहिती आहे. राज्याचं अर्थचक्र पुन्हा रूळावर येतेय, असं शंभूराज देसाई म्हणाले. यावेळी त्यांनी आगामी काळात शिवसेना (Shivsena) राज्याबाहेर वाढलेली दिसेल, असं देखील म्हटलंय.

अर्थसंकल्पात सर्वांना न्याय देण्याती भूमिका

शंभूराज देसाई यांनी अर्थसंकल्प सादर करताना सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही सरकारने घेतली असल्याचं म्हटलंय. विरोधी पक्षाच्या नेत्यांना टीका करायची आहे तर करू द्या. देशात महाराष्ट्र नंबर वन करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू झालाय, अस शंभूराज देसाई म्हणाले.

मतदारांचा कौल स्वीकारला

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. शिवसेना जिथं लढली त्या राज्यात जो मतदारांनी कौल दिलाय तो आम्ही स्वीकारलाय. राज्याच्या बाहेर शिवसेनेची वाढ करण्यासाठी आम्ही काम करण्यासाठी कामाला सुरुवात केलीये. बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले विचार सूत्र आम्ही विसरलो नाहीत, असं देखील देसाई यांनी सांगितलं.

इतर राज्यात पक्ष वाढवून दाखवू

लवकरच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही सांघिक प्रयत्न करून राज्याच्या बाहेर आम्ही आमचा पक्ष वाढवलेला दाखवून देऊ, असं शंभूराज देसाई म्हणाले.

प्रविण दरेकरांची भेट कशी झाली?

मी आज सातारा विश्रामगृहात गेलो होतो. तिथं, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आले होते. बाजूच्याच दालनात असल्यानं मी त्यांना भेटलो. न्यायप्रविष्ट असल्याने यावर काय बोलणार न्यायालयाचा निर्णय पुढे येईल, असं शंभूराज देसाई म्हणाले.

इतर बातम्या:

Pravin Darekar : भाजप नेत्यांवर कारवाईसाठी Sanjay Pandey यांना आणलंय, प्रविण दरेकरांचा गंभीर आरोप

पुण्यात भाजपकडून ‘देशद्रोही दाऊद सरकार’ची होळी! Chandrakant Patil यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल