Pravin Darekar : भाजप नेत्यांवर कारवाईसाठी Sanjay Pandey यांना आणलंय, प्रविण दरेकरांचा गंभीर आरोप

Pravin Darekar : भाजप नेत्यांवर कारवाईसाठी Sanjay Pandey यांना आणलंय, प्रविण दरेकरांचा गंभीर आरोप
भाजप नेते प्रवीण दरेकर
Image Credit source: Tv9

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) सातारा दौऱ्यावर आहेत. प्रविण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून (Mumbai Session Court) दिलासा मिळाल्यानंतर त्यांनी सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला.

प्रदीप कापसे

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 17, 2022 | 7:44 PM

सातारा : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) सातारा दौऱ्यावर आहेत. प्रविण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून (Mumbai Session Court) दिलासा मिळाल्यानंतर त्यांनी सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय आणखी कारवाई केली तरी घाबरणार नसल्याचं देखील ते म्हणाले आहेत. 2024 ला देशात आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. तर, शिवसेनेवर देखील त्यांनी टीका केलीय. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्यावरुन देखील दरेकर यांनी टीका केलीय.

संजय पांडे यांना भाजप नेत्यांवर कारवाईसाठी आणलं

मुंबईचे आयुक्त संजय पांडे यांना भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठीचं आणण्यात आलंय .माझ्यावर कारवाई संजय पांडेनीच केली असा गंभीर आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. भाजप नेत्यांवर कारवाई हे त्यांना टार्गेट देण्यात आलंय. प्रवीण दरेकरांवर जाणूनबूजून कारवाई करण्यात येतीये, असा दावा देखील त्यांनी केला आहे. या केसमध्ये दम नाही ही तयार करण्यात आली, असंही ते म्हणाले. मी सातत्याने सरकारला प्रश्न विचारतो त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मी घाबरणार नाही, असं देखील ते म्हणाले आहेत. मुँबै बँकच का ? राज्यातील अशा अनेक सहकारी संस्था आहेत त्याची यादी भाजपकडे आहे त्यावरती कारवाई करणार का ? हा आमचा सवाल असल्याचं दरेकर म्हणाले.

2024 ला भाजपचं सरकार येणार

2024 ला राज्यात भाजप आणि केंद्रातही भाजपचं येणार असल्याचा दावा प्रविण दरेकर यांनी केला. पाच राज्यात आपण बघितलं काय झालं? संजय राऊत तर गोव्यात मुख्यमंत्री बनवायला निघाले होते. त्यांना किती मतं मिळाली हे पाहिलंय उत्तर प्रदेशात आमच्या महादेव जानकरांना 50 हजार मतं मिळाली आहेत, असा टोला प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांना लगावला,

दरेकरांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. या दरम्यान आपच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन प्रविण दरेकर यांच्या विरोधात एफआयर दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी प्रविण दरेकर यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टानं अर्ज फेटाळल्यानंतर प्रविण दरेकरांनी सत्र न्यायालयात अर्ज केला. आता, प्रविण दरेकर यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.तोपर्यंत पोलिसांनी कठोर कारवाई करु नये, असं कोर्टानं सांगितलं आहे.

इतर बातम्या :

पुण्यात भाजपकडून ‘देशद्रोही दाऊद सरकार’ची होळी! Chandrakant Patil यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

‘करीयर संपवू शकतं एक पाऊल…’ IPL 2022 आधी अश्विनने गोलंदाजांना समज देतानाच दिला इशारा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें