अमित शाहांना पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखत होतं का? शरद पवारांची तोफ धडाडली

| Updated on: Oct 13, 2019 | 10:10 AM

आम्ही काय केलं हे विचारण्याचा अधिकार जनतेला आहे. अमित शाहांना नाही. अशा शब्दात शरद पवारांनी बीडमधील गेवराईत आयोजित सभेत अमित शाहांचा समाचार घेतला.

अमित शाहांना पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखत होतं का? शरद पवारांची तोफ धडाडली
Follow us on

बीड : अमित शाह महाराष्ट्रात येऊन आम्ही काय केलं विचारतात, पण त्यांना पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखत होतं का? असा
सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Amit Shah) यांनी विचारला आहे. बीडमध्ये विजयसिंह पंडित यांच्या प्रचारावेळी पवार बोलत होते.

‘पाच वर्षांपूर्वी अमित शहा यांना कोण ओळखत होतं. आज ते महाराष्ट्रात येतात आणि आम्ही काय केलं, असा सवाल
आम्हाला विचारतात. आम्ही काय केलं हे विचारण्याचा अधिकार जनतेला आहे. अमित शाह, तुम्हाला नाही. तुम्हाला
महाराष्ट्राबद्दल काय माहिती आहे?’ अशा कठोर शब्दात शरद पवारांनी अमित शाहांचा समाचार घेतला.

बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारवर निशाणा साधला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्यात आणि केंद्रात सत्ता आणली. छत्रपतींचे गड-किल्ले शौर्याचे प्रतीक होते. किल्ल्यांवर मावळ्यांच्या तलवारी चालल्या. तिथे मात्र या सरकारकडून हॉटेल आणि छम छम करण्यासाठी वापर केला जात असल्याची टीका देखील शरद पवार (Sharad Pawar on Amit Shah) यांनी यावेळी केली.

ईडी की फिडी मला कळत नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ईडीकडं जाऊ नका, शरद पवारांचा गौप्यस्फोट

याआधी, लातूरमधील उदगीरमध्ये झालेल्या सभेत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी भाष्य केलं. “ईडी
की फिडी मला कोणी काही करत नाही. सगळ्यांचे फोन आले की असं करु नका. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी
सांगितले की ईडीकडे जाऊ नका” असा गौप्यस्फोट पवार यांनी केला.

“मोठ्या लोकांचे 70 हजार कोटींचे कर्ज माफ झाले. शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्नही पवारांनी लातूरमधील सभेत उपस्थित केला होता. बँका वाचल्या पाहिजेत म्हणून यांनी ही कर्ज माफ केल्याचे सांगतात. पण मग शेतकरी वाचला अस वाटतं नाही का? असा सवालही पवारांनी विचारला होता.