पार्थ पवारांसमोर शिवसेनेचा उमेदवार ठरला!

मुंबई : शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 23 पैकी 21 उमेदवारांची शिवसेनेकडून घोषणा करण्यात आली आहे. सेनेच्या पहिल्या यादीत मावळमधून श्रीरंग बारणे यांचेही नाव आहे. त्यामुळे मावळमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे अशी लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे. राजकीय वर्तुळासह अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष मावळमधील लढतीकडे […]

पार्थ पवारांसमोर शिवसेनेचा उमेदवार ठरला!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई : शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 23 पैकी 21 उमेदवारांची शिवसेनेकडून घोषणा करण्यात आली आहे. सेनेच्या पहिल्या यादीत मावळमधून श्रीरंग बारणे यांचेही नाव आहे. त्यामुळे मावळमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे अशी लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे.

राजकीय वर्तुळासह अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष मावळमधील लढतीकडे लागलं आहे. कारण मावळमधून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मावळमधून शिवसेनेकडून श्रीरंग बारणे हेच लढणार की नवीन उमेदवार दिला जाणार, याची उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता आता संपली आहे. कारण शिवसेनेने मावळमधून आपला उमेदवार जाहीर केला आहे.

वाचा : लोकसभा निवडणूक : शिवसेनेची यादी जाहीर

शिवसेनेकडून मावळमधून पुन्हा एकाद विद्यमान खासदार श्रीरंग बारणे रणांगणात उतरणार आहेत. त्यामुळे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना पुन्हा एकदा श्रीरंग बारणे टक्कर देणार, हे निश्चित झाले आहे. आता मावळमधील लढत अधिक रंगतदार होणार, हेही निश्चित. विद्यमान खासदार विरुद्ध नवखा उमेदवार अशी लढत मावळमधून असेल.

शिवसेनेच्या उमेदवारांची यादी :

  1. दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
  2. दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे
  3. उत्तर पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर
  4. ठाणे- राजन विचारे
  5.  कल्याण- श्रीकांत शिंदे
  6. रायगड – अनंत गीते
  7. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
  8. कोल्हापूर- संजय मंडलिक
  9. हातकणंगले- धैर्यशील माने
  10. नाशिक- हेमंत गोडसे
  11. शिर्डी- सदाशिव लोखंडे
  12. शिरुर- शिवाजीराव आढळराव-पाटील
  13. औरंगाबाद- चंद्रकांत खैरे
  14. यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
  15. बुलडाणा- प्रतापराव जाधव
  16. रामटेक- कृपाल तुमाणे
  17. अमरावती- आनंदराव अडसूळ
  18. परभणी- संजय जाधव
  19. मावळ- श्रीरंग बारणे
  20. हिंगोली – हेमंत पाटील
  21. उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर

निवडणुकीच्या तारखा जाहीर :

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

संबंधित बातमी : शिवसेनेच्या पहिल्या यादीत एका विद्यमान खासदाराला डच्चू