Big Breaking : मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट भोवली, शिवसैनिकांनी दिला युवकाला चोप

Big Breaking : मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट भोवली, शिवसैनिकांनी दिला युवकाला चोप
CM Uddhav Thackeray यांच्या हस्ते होणार मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन
Image Credit source: tv9 marathi

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या युवकास शिवसैनिक व महिला पदाधिकाऱ्यांनी खानदेश सेंट्रल मॉल परिसरात चोप दिला आहे.

अनिल केऱ्हाळे

| Edited By: दादासाहेब कारंडे

Mar 27, 2022 | 9:59 PM

जळगाव : सोशल मीडियावर (Social media post) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav thackeray)  यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणे युवकास भोवले आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या युवकास शिवसैनिक (Shivsena) व महिला पदाधिकाऱ्यांनी खानदेश सेंट्रल मॉल परिसरात चोप दिला आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, त्याला पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले आहे. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि सोशल मीडिया आहे. याचे जसे फायदे आणि मनोरंजन आहे. तसेच याचे काही मोठे तोटेही आहे. अनेकजण भावनेच्या भरात सोशल मीडियावर कसेही व्यक्त होतात. मात्र त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. तसाच प्रकार हा जळगावमधील तरूणासोबत घडला आहे. या मरहाणीचा व्हिडोही समोर आला आहे.

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओत नेमकं काय दिसतंय?

या व्हिडिओत पाहिल्यास सुरूवातील काही लोकांनी या तरूणाला घेराव घातल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर जमलेला सर्व घोळका त्या तरुणावर तुटून पडत आहे. आणि त्याला तुफान मारहाण करताना दिसत आहे. मात्र एवढ्या गर्दीतही एक महिला पुढे येत या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच त्याला कडाडून मिठी मारत गर्दीतून बाहेर नेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याला वाचवताना तिलाही मार लागल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या गर्दीला मात्र या महिलेलाही हात लागत आहेत. याचेही भान उरलेलं नाहीये. हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने सध्या जळगावसह राज्यात खळबळ माजली आहे. या महिलेला या गर्दीत झालेली मारहाण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही महिला त्याची पत्नी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तरुणाच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

या तरूणाने सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत शरद पवार, उद्धव ठकारे, इम्तियाज जलील, याच्याबाबत आक्षेपार्ह अशी पोस्ट आहे. या पाठिमागे राहुल गांधीही दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर हा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. याआधीही आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर अनेकांना मरहाण झाल्याचे समोर आले आहेत. तसाच प्रकार पुन्हा घडल्याने सध्या जळगावात तणाव आहे. आता पोलीस या प्रकरणात कुणावर आणि काय कारवाई करतात? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सांगलीत गोपीचंद पडळकरांनी डिजीटल गनिमी कावा नेमका कसा साधला? पाहा Video

‘काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार’, नाना पटोलेंचं सुजय विखे पाटलांना जोरदार प्रत्युत्तर

तलवार दाखवल्यानंतर माझ्यावर गुन्हा, आता काँग्रेस नेत्यांवर तीच कारवाई करा, मोहीत कंबोज यांची मागणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें