‘काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार’, नाना पटोलेंचं सुजय विखे पाटलांना जोरदार प्रत्युत्तर

सुजय विखे पाटील यांच्या या टीकेला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार, असा पलटवार पटोले यांनी केलाय.

'काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार', नाना पटोलेंचं सुजय विखे पाटलांना जोरदार प्रत्युत्तर
नाना पटोले यांचं सुजय विखे पाटील यांना प्रत्युत्तरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 9:29 PM

औरंगाबाद : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपमध्ये रोज कुठल्या ना कुठल्या कारणावरुन, वक्तव्यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना, टीका-टिप्पणी होताना पाहायला मिळते. पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि आताचे भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडीवर आणि खास करुन काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका केलीय. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस नवऱ्याच्या, शिवसेना बायकोच्या तर काँग्रेस बिनबुलाये वऱ्हाडी असल्याचा टोला सकाळी लगावला. सुजय विखे पाटील यांच्या या टीकेला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार, असा पलटवार पटोले यांनी केलाय. ते आज औरंगाबादेत बोलत होते.

सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर केलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी नाना पटोले यांना विचारलं. त्यावेळी काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार. सुजय विखे पाटील याच्यावर जास्त बोलणे योग्य नाही. कारण तो अजून मुलगा आहे, असा टोला पटोले यांनी लगावलाय. दरम्यान, ‘महाविकास आघाडीचा संसार असा आहे की, लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. त्यात राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे. कारण त्यांची मनमानी सुरु असते. शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे, ती बिचारी काहीच बोलत नाही. तर काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत, त्यांना कितीही बोललं तरी हे जेवणाचं ताट सोडायला तयार नाहीत, अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली होती.

31 मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलन

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात 136 दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांना त्रस्त करणा-या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला सरकारला जागे करण्यासाठी 31 मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आज पटोले यांनी दिलीय.

‘मोदी सरकारनं जनतेला महागाईच्या खाईत लोटलं’

‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा भाजपाचा कारभार आहे. निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामारे जायला नको म्हणून इंधन दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपल्या मते घेतली निवडणून आले आणि लगेचच जनतेवर महागाईचा भार टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील पाच दिवसात पेट्रोल, डिझेल 3.20 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे तर एलपीजी गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. काही ठिकाणी एलपीजी सिलिंडर 1 हजार ते 1 हजार 100 रुपये एवढ्या किमतीला घ्यावा लागत आहे. सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे दरही वाढले असून 1 एप्रिलपासून औषधांचे दरही वाढणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटत असून त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नसल्याची टीकाही पटोले यांनी केली आहे.

इतर बातम्या : 

‘भाजपच्या सत्तेच्या काळातच काश्मिरी पंडितांचं विस्थापन’, पवारांचं वक्तव्य; विद्वेषाचं राजकारण सुरु असल्याचाही आरोप

सांगलीत गोपीचंद पडळकरांनी डिजीटल गनिमी कावा नेमका कसा साधला? पाहा Video

Breaking : पडळकरांचा डिजीटल गनिमी कावा! अहिल्यादेवी होळकर स्मारकावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी, लोकार्पण केल्याचा दावा

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.