थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार; खासदार सुजय विखे-पाटलांचा दावा

सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगरच्या कर्जत येथील एका कार्यक्रमात हा दावा केला आहे. थोडं थांबा. दिवाळीनंतर आपलंच सरकार येणार आहे, असा दावा त्यांनी केला. (bjp will form government in maharashtra after diwali, says sujay vikhe patil)

थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार; खासदार सुजय विखे-पाटलांचा दावा
सुजय विखे-पाटील, भाजप खासदार

नगर: थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे, असा दावा भाजप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी केला आहे. सुजय विखे-पाटील फारसं राजकीय भाष्य करत नाहीत. पहिल्यांदाच त्यांनी राजकीय भाष्य केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. (bjp will form government in maharashtra after diwali, says sujay vikhe patil)

सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगरच्या कर्जत येथील एका कार्यक्रमात हा दावा केला आहे. थोडं थांबा. दिवाळीनंतर आपलंच सरकार येणार आहे, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर मात्र त्यांनी घुमजाव केलं. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी तसं विधान केलं, अशी सारवासारव त्यांनी केली आहे. यापुढेही असं बोलत राहू असही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी ते कर्जत दौऱ्यावर होते. त्यावेळी ते कार्यकर्त्यांशी बोलतांना दिवाळी नंतर राज्यात भाजप सरकार येईल असा दावा केला होता.

तर भाजप निवडून येईल

यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं होतं. आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, म्हणजे काय तर ते गुलदस्त्यात आहे, त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. बिहार निवडणुकीचा परिणाम आता यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. आताही 18 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे या निकालाचा परिणाम पश्चिम बंगालच नाही, तर यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. तुम्ही कामगार, विद्यार्थी, शेतकरी, महिला अशा 1 हजार जणांचा सर्व्हे करा, त्यातले 900 जण भाजपला मतदान करतो, असे सांगतील, असा दावा पाटील यांनी केला होता.

कोण आहेत सुजय विखे-पाटील?

डॉ. सुजय विखे-पाटील हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांचे पुत्र आहेत. सुजय विखे-पाटील यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1982 रोजी झाला. त्यांचा विवाह पूर्वाश्रमीच्या धनश्री कुंजीर यांच्याशी झाला आहे. सुजय विखे पाटील हे पेशाने न्यूरोसर्जन आहेत. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. तसंच विखे-पाटील फाऊंडेशनचे ते प्रमुख आहेत. 2013 पासून डॉ. सुजय विखे-पाटील हे राजकारणात सक्रिय आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे.

राजकीय कारकीर्द

युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना सुजय विखे-पाटील यांनी नगर जिल्ह्यात आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे विणायला सुरुवात केली होती. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या कारभाराचा अनुभव असलेल्या सुजय विखे यांनी सहकार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी गणेश व डॉ. तनपुरे हे बंद पडलेले साखर कारखाने चालवायला घेतले होते. याशिवाय, विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते नगर जिल्ह्यात कायम सक्रिय राहिले. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सुजय विखे पाटील यांच्याविरोधात संग्राम जगताप यांच्यासारखा तगडा उमेदवार उतरवला होता. संग्राम जगताप दोन वेळा नगरचे महापौर होते. मात्र, सुजय विखे-पाटील यांनी आपल्या नेटवर्किंगच्या बळावर संग्राम जगताप यांचा 1,45,000 मतांनी पराभव केला होता. (bjp will form government in maharashtra after diwali, says sujay vikhe patil)

 

संबंधित बातम्या:

12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा आज सुटण्याची आशा, मविआ नेते राज्यपालांना भेटणार?

Maharashtra Rains : राज्यात पावसाचा जोर कमी, अनेक ठिकाणी उघड-झाप, कुठे काय स्थिती?

विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा, शिक्षण विभागाकडून 11 वी शुल्क कपातीचा निर्णय

(bjp will form government in maharashtra after diwali, says sujay vikhe patil)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI