तलवार दाखवल्यानंतर माझ्यावर गुन्हा, आता काँग्रेस नेत्यांवर तीच कारवाई करा, मोहीत कंबोज यांची मागणी

तलवार दाखवल्यानंतर माझ्यावर गुन्हा, आता काँग्रेस नेत्यांवर तीच कारवाई करा, मोहीत कंबोज यांची मागणी
मोहीत कंबोज यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
Image Credit source: twitter

मोहीत कंबोज यांनी काँग्रेस नेत्यांना टार्गेट केले आहे. काँग्रेस नेते अस्लम शेख आणि इतर काही नेत्यांनी एका कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणावरून त्यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. त्यानंतर अस्लम शेख वर्षा गायकवाड यांचा फोटो ट्विट करत सरकारला काही खोचक सवाल केले आहेत.

दादासाहेब कारंडे

|

Mar 27, 2022 | 7:19 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते मोहीत कंबोज (Mohit Kamboj) महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) तुटून पडत आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी अनेकदा संजय राऊत आणि नवाब मलिक यांना टार्गेट केले आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही मोहीत कंबोज यांच्यावर डझनभर आरोप केले आहे. मात्र त्या आरोपांना उत्तर देताना मोहीत कंबोज यांनी संजय राऊत आणि नवाब मलिक यांना सलीम जावेदची जोडी अशी उपमा दिली आहे. मात्र मोहीत कंबोज यांनी काँग्रेस नेत्यांना टार्गेट केले आहे. काँग्रेस नेते अस्लम शेख आणि इतर काही नेत्यांनी एका कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणावरून त्यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. त्यानंतर अस्लम शेख वर्षा गायकवाड यांचा फोटो ट्विट करत सरकारला काही खोचक सवाल केले आहेत.

मोहीत कंबोज यांचे पोलिसांना तिखट सवाल

काही दिवासांपूर्वी नवाब मलिक यांना अटक झाल्यावर भाजप नेत्यांनी राज्यभर जल्लोष केला. हा जल्लोष करताना भाजप नेते मोहीत कंबोज यांनी कार्यकर्त्य्यांसह जल्लोष साजरा केला. तेव्हा त्यांनी तलवार दाखवली होती. त्यानंतर मुंबई पोलीस मोहीत कंबोज यांच्या घरी पोहोचले, त्यावरूनच आता काँग्रेस नेत्यांना तोच न्याय लागू होणार का? असा सवाल त्यानी केलाय, त्यानी ट्विट करत…तलवार दाखवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी माझ्यावर शस्त्रास्त्र कायद्याचा गुन्हा दाखल केला आहे! आता मला पहायचे आहे की या 3 काँग्रेस नेत्यांविरुद्ध पोलीस एफआयआर नोंदवतील का? मी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना विनंती करतो की त्यांनी निःपक्षपाती आणि निष्पक्ष कारवाई करावी अन्यथा तुम्ही देखील इतरांसारखेच आहात, अशी घणाघाती टीका केली आहे.

मोहीत कंबोज यांचे ट्विट

काँग्रेसचेही जोरदार प्रत्युत्तर

कार्यक्रमात शिख समाजाने तलवार परंपरेप्रमाणे दिली. तशा तलवारी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही दिली आहे. पण आम्ही तलवार घेऊन लोकांमध्ये नाचलो नाही, दहशत नाही पसरवली, हा फरक आहे. असे प्रत्युत्तर काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी दिले आहे. तसेच भाजपकडे आरोप करण्याशिवाय काहीच उरलं नाही असेही ते म्हणाले आहेत.

औरंगजेबाचं काम करणाऱ्या भास्कर जाधवांचा बुरखा फाडणार, भगवान कोकरेंचं खुलं आव्हान

‘हा ड्रामा, हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण’, सोमय्या, पडळकरांच्या आंदोलनावर अमोल मिटकरींची तिखट शब्दात टीका

नव्या धमकी बद्दल धन्यवाद, महाग पडेल म्हणजे? Ed पकडून आणखी एक खोटे कांड करणार का? संजय राऊतांचा सवाल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें