राणेंच्या ‘त्या’ विधानाचा एकनाथ शिंदेकडून समाचार; म्हणाले, त्यात तथ्य नाही, हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

| Updated on: Aug 22, 2021 | 12:46 PM

एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असं विधान केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. राणेंच्या या वक्तव्याचा खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. (eknath shinde)

राणेंच्या त्या विधानाचा एकनाथ शिंदेकडून समाचार; म्हणाले, त्यात तथ्य नाही, हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
narayan rane
Follow us on

मुंबई: एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असं विधान केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. राणेंच्या या वक्तव्याचा खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. मला शिवसेनेत आणि मंत्री म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य आहे. राणेंच्या विधानात काही तथ्य नाही. हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. (Shiv Sena leader eknath shinde reply narayan rane over his comment)

एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी पक्षात समाधानी आहे. राणेंनी जे सांगितलं त्यात तथ्य नाही. ते पूर्णपणे चुकीचं आहे. मला जर स्वातंत्र्य नसतं तर मी हे निर्णय घेऊ शकलो नसतो. मातोश्री काय आणि उद्धव साहेब काय कोणीही माझ्या कामात हस्तक्षेप करत नाहीत, असं शिंदे म्हणाले.

राणेंनाही मोदींना विचारावच लागेल

राणे स्वत: युती सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. राज्याशी निगडीत मोठा निर्णय किंवा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असतो तेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारवंच लागतं. माझंच खातं नाही, कोणतंही खातं मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच सामुहिक निर्णय घेत असतं. हे राणेंना माहीत असेल. एवढेच नव्हे तर ते उद्योग मंत्री आहेत. उद्या त्यांना मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो पंतप्रधानांना विचारूनच घ्यावा लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला.

कामे करू शकलो असतो काय?

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. कालचं विधान हा त्याचाच एक भाग आहे, असं ते म्हणाले. कोव्हिडच्या काळात आम्ही विकासाची अनेक कामे केली. अनेक निर्णय घेतले. विकासही सुरू ठेवला आणि कोरोनाची परिस्थितीही नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या खात्याने अनेक कामे केली. मला स्वातंत्र्य नसते तर मी ही कामं करू शकलो असतो काय?, असा सवालही त्यांनी केला.

राणे काय म्हणाले होते?

राणेंची जन आशीर्वाद यात्रा काल वसईत पोहोचली होती. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी, एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. मातोश्रीशिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू, असा दावाही त्यांनी केला होता. (Shiv Sena leader eknath shinde reply narayan rane over his comment)

 

संबंधित बातम्या:

तर एकनाथ शिंदेंना आमच्यात घेऊ, ते शिवसेनेत कंटाळलेत, नारायण राणेंचा मोठा दावा

राज ठाकरे म्हणतात, राज्यातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी जबाबदार; रोहित पवारांनी पहिल्यांदाच दिलं जोरदार प्रत्युत्तर

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची राष्ट्रवादी करणार पोलखोल; रोज पत्रकार परिषदेतून हल्लाबोल करणार

(Shiv Sena leader eknath shinde reply narayan rane over his comment)