AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची राष्ट्रवादी करणार पोलखोल; रोज पत्रकार परिषदेतून हल्लाबोल करणार

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेचा राज्यभर उधळलेला वारू रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दंड थोपाटले आहेत. या जन आशीर्वाद यात्रेची राष्ट्रवादी काँग्रेस पोलखोल करणार आहे. (ncp will expose bjp's jan ashirwad rally over inflation)

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची राष्ट्रवादी करणार पोलखोल; रोज पत्रकार परिषदेतून हल्लाबोल करणार
ncp
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 11:59 AM
Share

मुंबई: भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेचा राज्यभर उधळलेला वारू रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दंड थोपाटले आहेत. या जन आशीर्वाद यात्रेची राष्ट्रवादी काँग्रेस पोलखोल करणार आहे. राष्ट्रवादीचे नेते रोज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल करत त्यांची पोलखोल करणार आहेत. (ncp will expose bjp’s jan ashirwad rally over inflation)

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी याबाबतची माहिती दिली. केंद्रातील भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले असतानाही जनआशिर्वाद यात्रा काढत आहे. या जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजपची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आजपासून राज्यातील विविध जिल्हयात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती महेश तपासे यांनी दिली.

महागाईवरून घेरणार

वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल गॅसची दरवाढ, कोरोना काळात आलेले अपयश, पेगॅससच्या माध्यमातून केलेली हेरगिरी या सर्व गोष्टींचा ऊहापोह या पत्रकार परिषदेत केला जाणार आहे. शिवाय ओबीसी व मराठा आरक्षणात केंद्रसरकार कशी चालढकल करुन राज्यात तेढ निर्माण करत आहे हेही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे.

कुणाची कधी पत्रकार परिषद?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो हे आज संध्याकाळी 5 वाजता वसई येथे तर जयदेव गायकवाड हे औरंगाबाद येथे आज संध्याकाळी 5 पत्रकार परिषद घेणार आहेत. तर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे हे अलिबाग येथे, 24 ऑगस्ट रोजी प्रवक्ते संजय तटकरे हे रत्नागिरी येथे संध्याकाळी 5 वाजता तर सिंधुदुर्गातील कणकवली येथे प्रवक्ते अंकुश काकडे हेही संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी त्या – त्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, आजी माजी- आमदार त्यांच्यासमवेत उपस्थित राहणार आहेत, असंही तपासे यांनी सांगितलं.

आशीर्वाद का द्यावेत?

दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे. जन आशीर्वाद यात्रा निघालीय, मात्र लोकांचे आशीर्वाद हे महाविकास आघाडीसोबत आहेत. गेल्या 2 वर्षांपासून काम चांगले चाललं आहे. कोरोना आणि उत्तर प्रदेशमधील गंगेची स्थिती पाहता यांना आशीर्वाद का द्यावेत हा जनतेला प्रश्न पडला असेल, अशी खोचक टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. (ncp will expose bjp’s jan ashirwad rally over inflation)

संबंधित बातम्या:

त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो; खासदार संभाजी छत्रपतींचा मोठा गौप्यस्फोट

ज्यपाल म्हणाले, 12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी सरकारचा आग्रह नाही; अजितदादा म्हणतात, मुख्यमंत्री आणि मी त्यांना पुन्हा भेटणार

नितीन गडकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्रं, उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं थेट उत्तर

(ncp will expose bjp’s jan ashirwad rally over inflation)

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.