Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो; खासदार संभाजी छत्रपतींचा मोठा गौप्यस्फोट

खासदार संभाजी छत्रपती यांनी आज मराठा मूक आंदोलनाला संबोधित करताना मोठा गौप्यस्फोट केला. संसदेत घटना दुरुस्तीवर बोलण्यासाठी मी परवानगी मागितली होती. पण मला परवानगी नाकारण्यात आली. (i had decided to Resign Rajya Sabha Seat, says sambhaji chhatrapati)

त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो; खासदार संभाजी छत्रपतींचा मोठा गौप्यस्फोट
sambhaji chhatrapati
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 1:43 PM

नांदेड: खासदार संभाजी छत्रपती यांनी आज मराठा मूक आंदोलनाला संबोधित करताना मोठा गौप्यस्फोट केला. संसदेत घटना दुरुस्तीवर बोलण्यासाठी मी परवानगी मागितली होती. पण मला परवानगी नाकारण्यात आली. महाराष्ट्रातील आपल्या खासदारांमुळे मला बोलायला संधी देण्यात आली. मात्र, ही संधी देण्यात आली नसती तर त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो, असा गौप्यस्फोट संभाजी छत्रपती यांनी केला. (i had decided to Resign Rajya Sabha Seat, says sambhaji chhatrapati)

मला समाजाची भावना मांडायची आहे. त्यामुळे मला संसदेत बोलण्याची परवानगी द्या, अशी मागणी मी केली होती. पण मला बोलायला परवानगी दिली नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट भांडल्याशिवाय मिळत नाही हे माझ्या लक्षात आलं. आपल्याकडे समाजाची ताकद आहे. शिव-शाहूंचा वारसा आहे. हा वारसा गप्प बसणार का? शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला धुडाकवून लावलं होतं. त्यामुळे त्याच दिवशी मी ठरवलं होतं. त्या दिवशी बोलायला दिलं नसतं तर अरे कुठली खासदारकी सोडून टाकली, असं म्हणून मी बाहेर पडणार होतो. पण नंतर मला बोलायला संधी दिली. तेव्हा माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी सरकारला सवाल केला. ज्या शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यांच्या पणतूला तुम्ही दोन मिनिटं बोलायला देत नसेल तर उपयोग काय माझा अशी सुरुवात मी केली, असं सांगतानाच महाराष्ट्रातील खासदारांनी मला बोलता यावं म्हणून मदत केली. त्यांचे आभार मानतो, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

आम्हाला आरक्षण हवंच

मराठा आरक्षण रद्द झाल्यावर काय करायचं? आता केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. पण आम्हाला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. आम्हाला आरक्षण हवं आहे, असं संभाजी छत्रपती यांनी ठणकावून सांगितलं.

पत्रं स्वीकारण्यास नकार

यावेळी त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली. अशोक चव्हाण कुठे आहेत? ते कुठेच दिसत नाहीत. त्यांनी मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याची जबाबदारी घ्यावी. भोसले आयोगाने ज्या त्रुटी सूचवल्या आहेत. त्या दूर कराव्यात, असं आवाहन त्यांनी केलं. नांदेडचे सुपुत्रं दिल्लीत आले होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते अनेकांना भेटले. मला त्यांना मला भेटायला वेळ नव्हता, अशी टीका त्यांनी केली. नाशिकमध्ये मराठा आंदोलनात पालकमंत्री छगन भुजबळ आले. पण नांदेडचे पालकमंत्री इथे आले नाहीत. पालकमंत्र्यांनीच आमच्या हातात पत्रं द्यायला हवं होतं. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून आलेलं पत्रं स्वीकारत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आम्ही सुद्धा 96 टक्के वाले मराठे

23 वसतिगृह आम्ही सुरू करणार आहोत, असं अशोक चव्हाण परवा बोलले. पण ठाणे सोडलं तर कुठलंही वसतिगृह सुरू झालं नाही. तेही मागच्या सरकारनेच केलेले आहे. तुम्ही नव्याने कोणते बनवले याचे उत्तर द्या, असा सवाल करतानाच अशोक चव्हाण यांच्याकडे याचे उत्तर नाही म्हणून ते इथे आले नसावेत, असा टोला त्यांनी लगावला. आमच्या आंदोलनात सगळे आले पण अशोक चव्हाण का आले नाहीत? आम्ही सुद्धा 96 टक्के वाले मराठे आहोत, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला. (i had decided to Resign Rajya Sabha Seat, says sambhaji chhatrapati)

संबंधित बातम्या:

खासदार संभाजी छत्रपती आक्रमक; सरकारला पहिल्यांदाच दिलं खुलं आव्हान

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, आता अजित पवारांचं ‘दादा स्टाईल’ उत्तर

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला भाजप जबाबदार होताच, आता तिसर्‍या लाटेलाही कारणीभूत ठरणार: नवाब मलिक

(i had decided to Resign Rajya Sabha Seat, says sambhaji chhatrapati)

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.