राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, आता अजित पवारांचं ‘दादा स्टाईल’ उत्तर

अजित पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. काही लोक कधी कधी काहीतरी बोलून जातात, त्यांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नाही, असं म्हणत अजितदादांनी राज ठाकरेंचं नाव घेणं देखील टाळलं.

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, आता अजित पवारांचं 'दादा स्टाईल' उत्तर
अजित पवार आणि राज ठाकरे
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Aug 20, 2021 | 12:54 PM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला अजितदादांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काही लोक कधी कधी काही तरी बोलून जातात, त्यांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नाही, असं म्हणत अजितदादांनी राज ठाकरेंचं नाव घेणं देखील टाळलं. (DCM Ajit Pawar Reply on MNS Raj Thackeray Over NCP Statement)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला होता. आज अजित पवार यांना पुण्यात पत्रकारांनी याच मुद्द्यावरुन प्रश्न विचारला असता त्यांनीही राज ठाकरेंवर त्यांच्या स्टाईलमध्ये निशाणा साधला.

अजित पवार काय म्हणाले?

शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं काम नाही, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.

राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते.

शरद पवार काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांच्या आरोपाला उत्तर देताना, “त्यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे”, असा सल्ला शरद पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना दिला होता.

हे ही वाचा :

शरद पवार म्हणाले, प्रबोधनकारांचं लिखाण वाचा, आता संभाजी ब्रिगेड राज ठाकरेंना आजोबांची पुस्तकं पाठवणार

बाबासाहेब पुरंदरेंवर इतिहासकारांचा ‘दंतकथे’चा आरोप, राज ठाकरेंचं पहिल्यांदाच थेट उत्तर

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, आता खुद्द शरद पवारांकडून उत्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें