खासदार महोदय बुलेटवर ट्रिपल सीट, शिवसेनेच्या खासदाराला दंड कोण ठोठावणार?

| Updated on: Oct 10, 2019 | 1:23 PM

नेहमी वेगळी कलाकारी आणि बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असणारे उस्मानाबाद शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर (Shiv Sena MP Omraje Nimbalkar triple seat on bike ) हे पुन्हा चर्चेत आले आहेत.

खासदार महोदय बुलेटवर ट्रिपल सीट, शिवसेनेच्या खासदाराला दंड कोण ठोठावणार?
Follow us on

उस्मानाबाद :  नेहमी वेगळी कलाकारी आणि बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असणारे उस्मानाबाद शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर (Shiv Sena MP Omraje Nimbalkar triple seat on bike ) हे पुन्हा चर्चेत आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उस्मानाबाद मतदारसंघातुन शिवसेनेकडून खा. ओमराजे निंबाळकर (Shiv Sena MP Omraje Nimbalkar triple seat on bike ) यांचे समर्थक कैलास पाटील हे उमेदवार आहेत.

पाटील यांच्यासाठी ओमराजे गावोगावी जाऊन प्रचार करीत आहेत. मात्र नुकतंच ओमराजे यांचं ट्रिपल सीट बसून बाईकवर प्रचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाहतुकीचे नियम हे फक्त सामान्यांसाठीच असतात का, असा प्रश्न सध्या हा व्हिडीओ व्हायरल करत उस्मानाबाद जिल्ह्यातील सामान्य लोक विचारत आहेत.

स्वतः खासदारांनी ट्रिपल सीट गाडीवर बसवून वाहतुकीचे नियम तोडल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. खासदारांना दंड ठोठावणार तरी कोण हा प्रश्न चर्चिला जात आहे.