भाजप खासदार राजेंद्र गावितांचा सेनेत प्रवेश, पालघरमधून उमेदवारी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघ अखेर महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेला देण्यात आला असून, या मतदारसंघातून शिवसेनेकडून भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून राजेंद्र गावित यांना पालघरमधून लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीनिवास वनगा यांना […]

भाजप खासदार राजेंद्र गावितांचा सेनेत प्रवेश, पालघरमधून उमेदवारी
Follow us on

मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघ अखेर महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेला देण्यात आला असून, या मतदारसंघातून शिवसेनेकडून भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून राजेंद्र गावित यांना पालघरमधून लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने पालघरमधून डावललं असलं, तरी वनगा यांना विधिमंडळात पाठवणार असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

विशेष म्हणजे, भाजपचे नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनीच राजेंद्र गावित यांच्या हातात शिवबंधन बांधलं आणि गावित यांचा सेनेत प्रवेश झाला. ‘मातोश्री’वर राजेंद्र गावित यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

भाजप खासदार चिंतामन वनगा यांच्या निधनामुळे काही महिन्यापूर्वीच पालघमध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपने काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत राजेंद्र गावित यांचा विजय झाला.

आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती करताना, पालघरच्या जागेचा हट्ट धरला होता. अखेर गावितांच्या हातात शिवबंधन बांधून सेनेने पालघरची जागा आपल्याकडे ठेवली आहे.