Sanjay Raut Exclusive | चिंतन आणि आत्मचिंतनाची बैठक त्यांच्याकडे जास्त, आम्ही कृती आणि अ‍ॅक्शनवाले : संजय राऊत

| Updated on: Dec 05, 2020 | 4:14 PM

'टीव्ही 9 मराठी'ला दिलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत संजय राऊतांनी अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली. (Shivsena Leader Sanjay Raut Exclusive Interview)

Sanjay Raut Exclusive | चिंतन आणि आत्मचिंतनाची बैठक त्यांच्याकडे जास्त, आम्ही कृती आणि अ‍ॅक्शनवाले : संजय राऊत
Follow us on

मुंबई : “येत्या निवडणुकांसाठी भाजपकडे मास्टर स्ट्रॅटजी आहे. त्यांच्याकडे मोठी फौज आहे. आम्ही साधे लोक आहोत. बसून चर्चा करतो, बैठका घेतो. कार्यकर्ते काम करतात. मात्र त्यांच्याकडे जागतिक यंत्रणा आहे. जागतिक स्तरावरुन त्यांना मदत मिळते,” असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. तसेच “आगामी मुंबई महापालिका किंवा इतर निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र लढेल,” असे संकेतही राऊतांनी दिले. (Shivsena Leader Sanjay Raut Exclusive Interview)

संजय राऊतांवर काही दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत संजय राऊतांनी अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली.

“मुंबई महापालिकेसह इतर निवडणुका एकत्र लढणार”

“पराभवाबद्दल शिवसेना आत्मचिंतन करेल. हा काही दोष नाही तो गुण आहे. आत्मचिंतनाची वेळ ही बालेकिल्ले गमवणाऱ्यांवर आली आहे. चिंतन आणि आत्मचिंतनाची बैठक त्यांच्याकडे जास्त आहे. आम्ही कृती आणि अॅक्शनवाले,” असेही संजय राऊतांनी यावेळी म्हटले.

“मुंबई महापालिका किंवा इतर निवडणुकीत आम्ही एकत्र राहू. कारण एकत्र राहण्याचे फायदे हे कालच्या निवडणुकीत दिसले. भाजपकडे मास्टर स्ट्रॅटजी आहे. त्यांच्याकडे याबाबत मोठी फौज आहे. आम्ही साधे लोक, बसून चर्चा करतो, बैठका घेतो. कार्यकर्ते काम करतात. त्यांच्याकडे जागतिक यंत्रणा आहे. जागतिक स्तरावरुन त्यांना मदत मिळते,” असा टोलाही राऊतांनी लगावला.

“महाविकासाघाडीचं शिल्प अजून चार वर्षे चालेल”

“महाविकासआघाडीचं शिल्प घडवून एक वर्ष झालं. ते काही तुटत नाही. पुढील चार वर्ष चालेल. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालानंतर समाजाचा कल कुठे आहे, ते आपल्याला समजायला लागलं आहे. पदवीधर आणि मतदारसंघात विचार करुन मतदान केले जाते. लोकांचा पाठिंबा कसा आहे, हे काल दिसलं. गेली 40 ते 45 वर्ष भाजपचा उमेदवार असलेल्या नागपुरातही काँग्रेसचा उमेदवार मोठ्या फरकाने जिंकला,” असे संजय राऊत म्हणाले.

“अमरावती शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत झाली. गेल्यावेळी श्रीकांत देशमुख हे अपक्ष लढले. आता त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आम्ही सर्व मिळून निवडणूक लढलो. आम्ही प्रत्येक निवडणूक ही महाविकासआघाडी म्हणून बघतो,” असेही राऊतांनी सांगितले. (Shivsena Leader Sanjay Raut Exclusive Interview)

“बालेकिल्ले हे गाफिलपणातही हरत नाही” 

“भाजपला जो धक्का बसला, तो साधा नाही. नागपूरला भाजपचा पराभव होणे म्हणजे शिवसेनेने परळ, लालबाग गमावण्यासारखे आहे. हे आमचे बालेकिल्ले आहेत. बालेकिल्ले हे गाफीलपणातही हरत नाही. पराभव झाला यानंतर नक्कीच चिंतन करु. त्या मतदारसंघात आम्हाला फार कमी वेळा यश मिळालं आहे,” असेही राऊतांनी स्पष्ट केले.

“डॉक्टरांनी मीडियाशी बोलू नये असे सांगितले आहे. काही तणाव आहेत, बेफिकरीपणाने राहतो, त्यामुळे यापुढे सर्वच पथ्यपाणी नीट पाळायची आणि रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ नये. गेल्यावेळी शस्रक्रिया झाली, तेव्हा काही भाग शिल्लक ठेवला होता. त्यानंतर कोव्हिडमुळे ते होऊ शकलं नव्हतं. ते वाढत गेले. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी हे सर्व करुन घेतलं.”

“खाण्यापिण्यासोबत राजकीय पथ्यही पाळायला सांगितली आहेत. पुढचे काही दिवस कमी बोला. फार कामाचा ताण घेऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच सोमवारपासून सामनात रुजू होणार,” असेही संजय राऊत म्हणाले. (Shivsena Leader Sanjay Raut Exclusive Interview)

संबंधित बातम्या : 

येत्या 1 मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास करणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

Sanjay Raut | संजय राऊतांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला