बेळगावात मराठी भाषिकांवर अन्याय,भाजप सरकारची सीमाप्रश्न सोडवण्याची मानसिकता नसल्याने निषेध : गुलाबराव पाटील

| Updated on: Nov 01, 2020 | 2:18 PM

शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केंद्रातील भाजप सरकारची बेळगाव सीमा प्रश्न सोडवण्याची मानसिकाता नाही, अशी टीका केली आहे. (Shivsena Minister Gulabrao Patil criticize BJP for not solving Belgaon issue )

बेळगावात मराठी भाषिकांवर अन्याय,भाजप सरकारची सीमाप्रश्न सोडवण्याची मानसिकता नसल्याने निषेध : गुलाबराव पाटील
Follow us on

जळगाव: शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केंद्रातील भाजप सरकारची बेळगाव सीमा प्रश्न सोडवण्याची मानसिकाता नाही, अशी टीका केली आहे. गेल्या 65 वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमा वाद आहे. याठिकाणी मराठी माणसांवर अन्याय सुरू आहे, असंही ते म्हणाले. (Shivsena Minister Gulabrao Patil criticize BJP for not solving Belgaon issue )

बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांचा महाराष्ट्रात येण्याचा लढा आजही सुरू आहे. मागच्या कालखंडात केंद्रात भाजपचे सरकार होते. तेव्हाही आमचा संयुक्त महाराष्ट्रासाठी पाठपुरावा सुरू होता. परंतु, केंद्रातील सरकारने लक्ष दिले नाही. आजही केंद्रात भाजपचे सरकार आहे. पण हा प्रश्न सोडवण्याची भाजप सरकारची मानसिकता नाही. त्यामुळे आम्ही आज शिवसेनेच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारचा काळ्या फिती लावून निषेध करत आहोत, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

बेळगाव, कारवार, निपाणी हा भाग संयुक्त महाराष्ट्रात आला पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे, असं गुलाबराव पाटील म्हणले. केंद्र सरकारने बेळगाव, निपाणी आणि कारवार महाराष्ट्राला जोडण्याचा निर्णय घ्यावा किंवा बेळगावसह मराठी भाषिक भाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली.

दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

संजय राऊत यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडले. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे वक्तव्य करू नये, असं सुनावलं आहे. संजय राऊत यांनी सूर्य-चंद्र राहीलच आम्हाला इतरांकडून ज्ञान घेण्याची गरज नाही, त्यांनी त्यांचं पाहावं, असा टोला सवदी यांना लगावला.

बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांची लढाई 60 वर्षांपासून सुरू आहे. ही आमच्या हक्काची लढाई आहे. सीमाभागातील जनतेच्या हक्कांची आणि अधिकाराची लढाई आहे. बेळगाव आणि सीमाभागातील जनतेला महाराष्ट्रात यायचं असेल तर त्यांच्या भावनेचा आदर केला पाहिजे. महाराष्ट्रात येऊ दिलं पाहिजे.

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ यंदा १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहे.  त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फित बांधून कामकाजाला सुरवात केली.

संबंधित बातम्या

कानडी पोलिसांचा आदेश झुगारत मराठी बांधव काळा दिन साजरा करण्यासाठी एकत्र, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध

सूर्य चंद्राचे ज्ञान शिकवू नका, संजय राऊतांनी बेळगावप्रश्नावरुन कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले

(Shivsena Minister Gulabrao Patil criticize BJP for not solving Belgaon issue )