AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’ सक्सेस, आता ‘रासगरबा’; 21 गुजराती उद्योगपतींचा रविवारी शिवसेनेत प्रवेश!

मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' असं सांगत गुजराती बांधवांसाठी जिलेबी-फाफडाची मेजवाणी देण्याचा शिवसेनेचा बेत चांगलाच यशस्वी झाला आहे. (shivsena organises raas garba for gujarati community ahead bmc election)

'जिलेबी-फाफडा डिप्लोमसी' सक्सेस, आता 'रासगरबा'; 21 गुजराती उद्योगपतींचा रविवारी शिवसेनेत प्रवेश!
| Updated on: Feb 03, 2021 | 12:43 PM
Share

मुंबई:मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं सांगत गुजराती बांधवांसाठी जिलेबी-फाफडाची मेजवाणी देण्याचा शिवसेनेचा बेत चांगलाच यशस्वी झाला आहे. शिवसेनेच्या या ‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’चं फलित म्हणून येत्या रविवारी 7 फेब्रुवारी रोजी 21 गुजराती उद्योगपती शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गुजराती उद्योगपतींच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेला आर्थिक बळ तर मिळणार आहेच शिवाय ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या व्होटबँकेला सुरुंग लावण्यातही शिवसेनेला यश मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (shivsena organises raas garba for gujarati community ahead bmc election)

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर असलेल्या गुजराती मतदारांना आकर्षिक करण्यासाठी शिवसेनेने मुंबईत ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी घोषणा देत जिलेबी, फाफडा आणि वडापावचा मुंबईत बेत आखला होता. या कार्यक्रमाला गुजराती बांधवांना बोलवण्यात आलं होतं. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह आणि कल्पेश मेहता यांच्या नेतृत्वात या भोजन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला गुजराती बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता शिवसेनेने गुजराती बांधवांसाठी येत्या 7 फेब्रुवारी रोजी आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात गुजराती बांधवांसाठी रासगरबाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच याचवेळी 21 गुजराती उद्योजक आणि व्यावसायिकांना शिवसेनेत प्रवेश देण्यात येणार आहे.

निवडणुकी आधी मोर्चेबांधणी

शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी गुजराती बांधवांसाठी येत्या ७ फेब्रवारी रोजी सायंकाळी 4 वाजता मालाडच्या सिल्व्हर ओक रेस्टॉरंटच्यावर लँडमार्क हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजित केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीला आता एक वर्षाचा अवधी उरलांय. त्यामुळे शिवसेनेनं आता भाजपची व्होटबँक असलेल्या गुजरातीबहूल विभागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन सुरू केलं आहे.

सलग दुसरा मेळावा

मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. शिवसेनेने या आधी 10 जानेवारी रोजी गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित केला होता. ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ म्हणत शिवसेनेकडून गुजराती समाजासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. अंधेरी-ओशिवरा इथल्या गुजरात भवनातील नवनीत हॉलमध्ये हा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात 100 गुजराती व्यापारी उपस्थित राहिले होते.त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोना असल्यामुळे या कार्यक्रमात कोरोना नियमांचं पालन करण्यात येणार आहे. तसेच प्रथम येणाऱ्या शंभर लोकांनाच सभागृहात प्रवेश देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शिवसैनिकही उपस्थित राहणार असल्याचं हेमराज शाह आणि कल्पेश मेहता यांनी सांगितलं. (shivsena organises raas garba for gujarati community ahead bmc election)

संबंधित बातम्या:

माणूस अनुभवाने शिकतो, शिवसेनेच्या जिलेबी फापडा, उद्धव ठाकरे आपडावर काँग्रेसची प्रतिक्रिया

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

“आता गुजराती भाषिकांचा मेळावा, भविष्यात मुस्लिमांचाही मेळावा घेतील, बिचाऱ्या शिवसेनेवर संगतीचा परिणाम”, दानवेंचा टोमणा

शिवसेनेची ‘स्नॅक्स डिप्लोमसी’; गुजराती मतांसाठी मेळाव्यात वडापाव-जिलेबी, फाफडाची फोडणी!

(shivsena organises raas garba for gujarati community ahead bmc election)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...