‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

येत्या 10 तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल 100 गुजराती बांधव शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. | Shivsena

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

मुंबई: भाजपकडून निर्माण झालेल्या तगड्या आव्हानामुळे आता शिवसेना मुंबई महानगरपालिका (BMC) जिंकण्यासाठी कामाला लागली आहे. त्यासाठी शिवसेनेने (Shivsena) फक्त मराठी मतदारांवर अवलंबून न राहता मुंबईच्या कॉस्मोपॉलिटीन मतदारांना साद घालायचे ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून आता शिवसेनेकडून मुंबईसह राज्यातील गुजरात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. (Shiv Sena will play Gujarati card in upcoming Mumbai BMC Election)

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

त्यासाठी शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. येत्या 10 तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल 100 गुजराती बांधव शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता शिवसेनेची भाजपच्या पारंपरिक मतदारांना आकर्षित करण्याची ही खेळी कितपत यशस्वी ठरणार, हे येणारा काळच ठरवेल.

आदित्य ठाकरेंचे ‘केम छो वरळी’

वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरे यांचे बॅनर्सही चर्चेचा विषय ठरला होता. आदित्य यांची वरळीतून उमेदवारी घोषित झाल्यानंतर अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने ‘केम छो वरळी’ असे गुजरातीतून पोस्टर्स लावले होते. या पोस्टर्सवरून विरोधकांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. यानंतर शिवसेनेला हे पोस्टर्स हटवावे लागले होते.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अतुल भातखळकरांची प्रभारीपदी नियुक्ती

2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून भाजपनं कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांची नियुक्ती जाहीर केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व 227 जागा स्वबळावर लढणार असल्याचे भाजपने जाहीर केलेले आहे. अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत पक्षाला घसघशीत विजय मिळवून देण्याचे आव्हान आमच्यासमोर असेल.

संबंधित बातम्या:

Opinion : हैदराबादचा निकाल, शिवसेनेसाठी धोक्याची घंटा का?

(Shiv Sena will play Gujarati card in upcoming Mumbai BMC Election)

Published On - 7:38 am, Tue, 5 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI