दानवेंच्या ‘त्या’ शेतकरी आंदोलनविरोधी विधानावरून शीख संस्था नाराज; संस्था म्हणाली…

| Updated on: Dec 10, 2020 | 9:20 PM

दानवे यांच्या वक्तव्याची दखल घेत दिल्ली येथील शीख संस्थेने च्यांच्या वक्तव्यावरुन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Raosaheb Danve farmers protest)

दानवेंच्या त्या शेतकरी आंदोलनविरोधी विधानावरून शीख संस्था नाराज; संस्था म्हणाली...
raosaheb danve
Follow us on

नवी दिल्ली : भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरील वक्व्याची दखल देशपातळीवर घेतली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे दिल्ली येथील शीख संस्थेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रावसाहेब दानवे यांचे ते वक्तव्य म्हणजे देशातील शेतकऱ्यांचा अपमान असल्याचं दिल्ली येथील शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती (DSGMC) या संस्थेने म्हटलं आहे. (Sikh body DSGMC on Raosaheb Danve controversial statement on farmers protest)

शीख संस्था काय म्हणाली ?

“देशातील शेतकरी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत आहेत. सरकार त्यांना न्याय देऊ शकत नाहीये. जे शेतकरी देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावतात. देशासाठी अन्न उगवतात तेच शेतकरी देशद्रोही असल्याचं भासवलं जातंय. असा प्रयत्न करु नये. केंद्रा मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांनी अत्यंत चुकीचे विधान केले आहे,” अशी प्रतिक्रिया डीएसजीएमसी (DSGMC) या संस्थेचे अध्यक्ष एस. मजिंदर सिंह यांनी दिली आहे.

दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा गुरुवारचा (10 डिसेंबर) 15 वा दिवस आहे. दिल्ली, हरियाणा तसेच इतर राज्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी आहेत. या शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना कडाडून विरोध केला जात आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राज्यातील तसेच देशातील अनेक पक्षांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे घटकपक्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.

रावसाहेब दानवे काय म्हणाले ?

रावसाहेब दानवे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना, दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांचे नाही. या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे. यापूर्वी देशातील मुस्लिम समाजाला भरकटवलं गेलं. सीएए आणि एनसीआरमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल, असं सांगितलं गेलं. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?,” असे दानवे म्हणाले. (Sikh body DSGMC on Raosaheb Danve controversial statement on farmers protest)

दानवेंच्या वक्तव्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया

दानवे यांच्या या वक्तव्यानंतर राज्य तसेच देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दानवे यांचं वक्तव्य चुकीचं असून त्यांच्याकडे याबाबबतचे पुरावे असतील तर ते त्यांनी पोलिसांना द्यावेत. दानवे यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम राहावे, असा खोचक सल्ला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिला. तर “शेतकऱ्यांच्या आंदोलनात कोणत्या परकीय शक्तींचा हात आहे; याबद्दल दानवे यांना माहीत असेल. कारण रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे केंद्रीय मंत्री आहेत,” असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी रावसाहेब दानवे यांची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली.

संबंधित बातम्या :

रावसाहेब दानवे जोड्याने मारायच्या लायकीचे; रघुनाथदादा पाटलांची घणाघाती टीका

दिल्लीतील आंदोलक शेतकरी पाक आणि चीनचे नव्हे, तर भारतीय; नवनीत राणांचा दानवेंवर पलटवार

‘त्या’ वक्तव्यावरुन दानवेंवर राज्यभर टीका, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मात्र पाठराखण; म्हणाले…

(Sikh body DSGMC on Raosaheb Danve controversial statement on farmers protest)