आम्ही शिर्डीत जाणारच !, नोटीस धुडकावत तृप्ती देसाई यांचा इशारा; साई मंदिरातील ‘त्या’ बोर्डावरुन वातावरण तापण्याची शक्यता

| Updated on: Dec 09, 2020 | 6:12 PM

काहीही झाले तरी आम्ही शिर्डीत जाणारच असे म्हणत, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पोलिसांची नोटीस धुडकावून लावली आहे. (Trupti Desai shirdi board)

आम्ही शिर्डीत जाणारच !, नोटीस धुडकावत तृप्ती देसाई यांचा इशारा; साई मंदिरातील त्या बोर्डावरुन वातावरण तापण्याची शक्यता
Follow us on

अहमदनगर : काहीही झाले तरी आम्ही शिर्डीत जाणारच असे म्हणत, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पोलिसांची नोटीस धुडकावून लावली आहे. त्यामुळे शिर्डीतील साईमंदिरात लावलेल्या बोर्डावरुन आगामी काळात वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (social activist Trupti Desai will go to shirdi for removing the board of dress code)

‘साई मंदिरात प्रवेश करताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये’, असे आवाहन साई संस्थानने केलेले आहे. साई मंदिर परिसरात तशा आशयाचे फलकही लावण्यात आलेले आहेत. साई संस्थानच्या याच आवाहनावर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी साईबाबा मंदिरातील तो बोर्ड काढण्याची मागणी केली आहे. तसेच, साई संस्थानने तो बोर्ड काढला नाही, तर स्व:त जाऊन त्या बोर्डाला हटवण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे.

गुरुवारी पुण्याहून शिर्डीकडे निघणार

दरम्यान, आठ दिवस झालेले असूनही शिर्डीतील तो बोर्ड हटवण्यात आलेला नाही. त्यामुळे देसाई यांनी शिर्डीला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्या गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता पुण्याहून शिर्डीला जाणार आहेत. यावर बोलताना, “आठ दिवस झाले तरी साई संस्थानने ड्रेसकोडचा बोर्ड काढलेला नाही. अशा परिस्थितीत आम्हाला नोटीस बजावून शिर्डीत येण्यास प्रतिबंध केला जातो. लोकशाहीत आवाज दाबला जात आहे. तरी आम्ही शिर्डीत जाणारच.” अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली. (social activist Trupti Desai will go to  shirdi)

साई संस्थानचे भक्तांना काय आवाहन?

फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईमंदिरात ‘तोकडे कपडे घालून येऊ नये. भक्तांनी भारतीय पेहरावात साईमंदिरात यावं,’ असं आवाहन साईबाबा संस्थानकडून (Saibaba Sansthan) करण्यात आलं आहे. मंदिरात भारतीय पेहरावात यावं, अशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. “साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी अनेक जण तोकडे कपडे घालून येत असल्याचे निरीक्षणात आले आहे. तीर्थस्थळी येताना भारतीय पेहरावात यावं,” असं साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सांगितलं

दरम्यान, देसाई यांनी शिर्डीला जाणार असल्याचे जाहीर केल्यामुळे साई मंदिरात लावलेल्या त्या बोर्डामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

अबब! अवघ्या 9 दिवसांत साईचरणी कोट्यवधींचं दान

तुळजाभवानी मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा!, भाविक, पुजारी, व्यापारीही मास्कविना, ज्येष्ठांनाही मंदिरात प्रवेश

शिर्डीमध्ये मंदिर सुरू झालं पण भाविक आणि प्रशासन नियम पाळतंय का? वाचा रिअ‍ॅलिटी चेक

(social activist Trupti Desai will go to shirdi for removing the board of dress code)