त्या वृद्धाला मारहाण करणारे कार्यकर्ते भाजपचे, माझे नाही : प्रकाश आंबेडकर

अमरावती : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या एका वृद्ध सामाजिक कार्यकर्त्याला त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. पण हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. वृद्धाला मारहाण करणारे प्रकाश आंबेडकरांचे समर्थक असल्याचं सांगितलं जात होतं. पण हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं सांगत प्रकाश आंबेडकरांनी हा दावा खोडून काढलाय. वंचित बहुजन आघाडीचे […]

त्या वृद्धाला मारहाण करणारे कार्यकर्ते भाजपचे, माझे नाही : प्रकाश आंबेडकर
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

अमरावती : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या एका वृद्ध सामाजिक कार्यकर्त्याला त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. पण हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. वृद्धाला मारहाण करणारे प्रकाश आंबेडकरांचे समर्थक असल्याचं सांगितलं जात होतं. पण हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं सांगत प्रकाश आंबेडकरांनी हा दावा खोडून काढलाय.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू नाही, तर फालतु आहे, ते आरएसएसचे पालतु आहे, अशी पोस्ट या व्यक्तीने टाकली होती. याचाच राग मनात धरुन दर्यापूर येथील नगरसेवक संतोष कोल्हे यांनी ही पोस्ट टाकणाऱ्या वृद्ध व्यक्तीला दर्यापुरातल्या एक हॉटेलमध्ये जाऊन त्यांना मारहाण केली. शिवाय या घटनेचा व्हिडीओही व्हायरल केला आहे.

VIDEO : मारहाणीचा व्हिडीओ