Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली अमित शाह यांची भेट, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याही दिल्लीत भेटीगाठी

| Updated on: Jul 08, 2022 | 9:49 PM

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही आज दिल्लीतच मोठ्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली अमित शाह यांची भेट, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याही दिल्लीत भेटीगाठी
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली अमित शाह यांची भेट
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात नवस सरकार स्थापन झाल्यानंतर राजधानी दिल्लीत आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह (Eknath Shinde) बड्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आज रात्रीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. खातेवाटप आणि इतर विविध विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही आज दिल्लीतच मोठ्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांचीही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नवस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झाले आहेत. या भेटीपूर्वी राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना एक पत्रही लिहिले आहेत. ज्यात त्यांनी 10 जुलै ला बकरी ईद आहे त्या पार्श्वभूमीवर गाईंची कत्तल थांबवा, असे आवाहन पोलीस महासंचालकांना केले आहे.

विधानसभा अध्यक्षांनी घेतली अमित शाह यांची भेट

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही घेणार अमित शाह यांची भेट

मुख्यमंत्री उद्या पंतप्रधान मोदींना भेटणार

राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप हे अजूनही झालेलं नाही. दिल्लीतल्या या भेटीगाठी संपल्यानंतर राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराला आणि खाते वाटपाला वेग येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंड करत हिंदुत्वाचा नारा देत भाजपसोबत सत्तेत बसणे पसंत केले. त्यानंतर भाजप नेत्यांची हे त्यांना भरभरून साथ मिळाली, त्यामुळे आता खातेवाटप कसं होतंय? याकडेही सर्वांचा लक्ष लागलंय. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला आल्याने अनेक महत्त्वाची पदं भाजप आपल्याकडे ठेवण्याची दाट शक्यता आहे. यात आता भाजपच्या वाट्याला कोणती मंत्रालयं जाणार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला कोणती खाती मिळणार हेही चित्र या भेटीगाठीनंतर स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे.