निवडणूक ड्युटीवरील जवानाची आत्महत्या

पटना (बिहार) : निवडणूक ड्युटीवर असलेल्या सीमा सुरक्षा बल (एसएसबी) जवानाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना हाजीपूर येथे घडली आहे. ईश्वर गिरीधर चौधरी असे जवानाचे नाव असून, त्यांनी स्वत:च्या बंदुकीतून गोळी मारत आत्महत्या केली. चौधरी हे मूळचे जळगाव (महाराष्ट्र) येथील रहिवाशी आहेत. चौधरींच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप कळू शकलं नाही. ईश्वर गिरीधर चौधरी हे एसएसबी 65 […]

निवडणूक ड्युटीवरील जवानाची आत्महत्या
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

पटना (बिहार) : निवडणूक ड्युटीवर असलेल्या सीमा सुरक्षा बल (एसएसबी) जवानाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना हाजीपूर येथे घडली आहे. ईश्वर गिरीधर चौधरी असे जवानाचे नाव असून, त्यांनी स्वत:च्या बंदुकीतून गोळी मारत आत्महत्या केली. चौधरी हे मूळचे जळगाव (महाराष्ट्र) येथील रहिवाशी आहेत. चौधरींच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप कळू शकलं नाही.

ईश्वर गिरीधर चौधरी हे एसएसबी 65 बटालियनमध्ये तैनात होते. बिहारमधील हाजीपूर जिल्ह्यात एसएसबीचं पथक थांबलं आहे. आज हाजीपूर येथे मतदान असल्याने, तिथे रवाना होण्याआधी ईश्वर गिरीधर चौधरी यांनी बंदुकीतून गोळी झाडत आत्महत्या केली.

हाजीपूरमध्ये आज मतदान असून, इथे एनडीएकडून लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचे भाऊ पशुपती कुमार पारस हे मैदानात आहेत, तर महागठबंधनकडून राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवचंद्र राम उमेदवार आहेत. एकूण 11 उमेदवार हाजीपूरमधून रिंगणात असले, तरी पशुपती कुमार पारस आणि शिवचंद्र राम यांच्यातच मुख्य लढत आहे.

18 लाख 17 हजारांहून अधिक मतदार संख्या असलेल्या हाजीपूर लोकसभा मतदारसंघात हाजीपूर, लालगंज, महुआ, राजापाकर, राघोपूर, महनार असे विधानसभ क्षेत्र येतात.