मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

शिवसेना शिंदे गटातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांना मोठा धक्का बसला आहे. थेट या खासदारांना सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे. दोन आठवड्यांच्या आता या खासदारांना नोटीसही उत्तर द्यावे लागेल. या खासदारांच्या अडचणीत वाढ झाली.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस
6 rebel MP from the Thackeray faction
| Updated on: Jul 22, 2026 | 12:25 PM

शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देत स्वतंत्र गट स्थापनेची मागणी केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गटाला मान्यता दिली. या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांना मोठा झटका होता. 6 खासदारांनंतर विधान परिषदेचे उपसभापती म्हणून सचिन आहिर यांनी थेट अर्ज भरला. ठाकरे गटातून मोठी बंडखोरी होताना दिसतंय. त्यामध्येच आता शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांना मोठा दणका बसला. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना थेट सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली. याच याचिकेनंतर या खासदारांना नोटीस पाठवण्यात आली.

हा मोठा झटका 6 खासदारांना आहे. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेला उत्तर देण्याबाबतही कोर्टाने आदेश दिले आहेत. 6 फुटीर खासदारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. हेच नाही तर या नोटीसला दोन आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे आदेश आहेत.

6 खासदारांसाठीच नाही तर एकनाथ शिंदे यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता या 6 खासदारांकडून नक्की काय उत्तरे दिली जातात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. यापूर्वी या खासदारांना पक्षाकडूनही नोटीस देण्यात आली होती. या नोटीसला 7 दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले होते. आता कोर्टाने नोटीस पाठवली.

यापूर्वी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्याकडून 6 खासदारांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टाकडून नोटीस पाठवण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला काही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावरही होते. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच फुटीर खासदारांच्या अडचणीत वाढ झाली.

सुप्रीम कोर्टाच्या नोटीसला दोन आठवड्यात 6 फुटीर खासदारांना उत्तर द्यावे लागणार आहे. खासदार ओमराजे निंबाळकर, संजय ऊर्फ बंडू जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचाैरे यांनी शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी केली. ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यात राबवण्यात आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us