Ranveer Allahbadia Video : ‘…म्हणून काहीही वक्तव्य करणार का?’, कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं, इथून पुढे कोणताही शो…
समाजात कोणीही अशी वक्तव्य स्वीकारणार नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टानं यापुढे रणवीरला कोणताही शो करता येणार नाही असंही म्हंटलंय. तर जीवाला धोका असल्यास तुम्ही राज्य सरकारकडे सुरक्षेची मागणी करू शकता, असंही कोर्टानं म्हंटलंय.
तुम्ही लोकप्रिय आहात म्हणून काहीही वक्तव्य करणार का? सुप्रीम कोर्टानं रणवीर अलाहबादियाला चांगलंच झापलं आहे. समाजात कोणीही अशी वक्तव्य स्वीकारणार नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टानं यापुढे रणवीरला कोणताही शो करता येणार नाही असंही म्हंटलंय. समाजामध्ये कोणीही अशी वक्तव्य स्वीकारणार नाही, विकृत मानसिकता दाखवणारं हे वक्तव्य आहे, असं कोर्टानं म्हंटलंय. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये एका स्पर्धकाला रणवीर अलाहबादियाने आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारला होता. या प्रकरणी रणवीर अलाहबादियाला सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे. यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर आजसुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यामध्ये यापुढे रणवीरला कोणताही शो करता येणार नाही, रणवीरला आता परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. तसेच रणवीरला त्याचा पासपोर्ट पोलीस स्टेशनला जमा करावा लागेल, असे निदर्श सुप्रीम कोर्टाने दिलेत. अनेक राज्यात रणवीरवर गुन्हे दाखल आहेत, त्याच्या जीवाला धोका आहे, अशी माहिती रणवीरच्या वकिलांनी कोर्टात दिली. तर मुंबई आणि गुवाहाटीमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, रणवीरच्या जीवाला धोका असेल तर तुम्ही राज्य सरकारकडे सुरक्षेची मागणी करा, असंही कोर्टानं त्यावर म्हंटलंय. दिलासादायक म्हणजे रणवीरला सध्या अटक करता येणार नाही, वादग्रस्त एपिसोडवर यापुढे नवा गुन्हा दाखल करता येणार नाही, असंही कोर्टानं म्हंटलंय.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
