AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी… भाजपचा पहिला उमेदवार विजयी? कोणत्या महापालिकेचा निकाल? काय घडलं नेमकं?

BJP 1st Corporator Won : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. महानगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी... भाजपचा पहिला उमेदवार विजयी? कोणत्या महापालिकेचा निकाल? काय घडलं नेमकं?
BJP VictoryImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Dec 30, 2025 | 10:45 PM
Share

विनायक डावरूंग, सुनील जाधव, प्रतिनिधी :  राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारी मिळालेल्या सर्व उमेदवारांनी आज अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक उमेदवारांनी नाराजीही व्यक्त केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी ऐनवेळी पक्षांतर करत अर्ज दाखल केला. तर काही उमेदवारांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे. महानगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भाजपने खातं उघडलं

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. कल्याण पूर्वेतील 18 अ प्रभागात भाजपच्या रेखा राजन चौधरी या जवळपास बिनविरोध झाल्या आहेत. 18 अ प्रभागात ओबीसी महिला आरक्षित जागेसाठी भाजपच्या रेखा चौधरी याचा एकच अर्ज आल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. उद्या कागदपत्र पडताळणी होणार असून त्यानंतर विजयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र रेखा चौधरी यांची विजय निश्चित मानला जात आहे.

रेखा राजन चौधरी यांचा विजय

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीआघीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या यांच्या विशेष प्रयत्नांना यश आले आहे. भाजपच्या रेखा राजन चौधरी या नगरसेविकेची बिनविरोध निवड धाली आहे. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत. रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय आहे अशी भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.

रेखा राजन चौधरी या भाजपच्या कल्याण विभागाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. आता कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रभाग क्रमांक 18 अ मधून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यासह कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने खाते उघडले आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, आता 31 तारखेला कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरही काही उमेदवार बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?